आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोरांच्या एका गटाची माघार, येमेनला दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिवासी संघटनेने रविवारी सरकारी फौजांचे समर्थन केले.
सना - गेल्या सहा आठवड्यांपासून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या हवाई हल्ल्यानंतर अखेर बंडखोरांच्या एका गटाने युद्धबंदीची तयारी दर्शवली आहे. सौदीच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला आपण स्वीकारत असल्याचे या गटाने रविवारी स्पष्ट केले. त्यामुळे येमेनच्या नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

सत्तेबाहेर असलेले माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या निवासस्थानाला सौदी अरेबियाच्या हवाई दलाने लक्ष्य केल्याची बातमी धडकल्यानंतर काही वेळातच सदर गटाने ही घोषणा केली. येमेनमधील शिया बंडखोरांना रेनेगडे नावाचा सशस्त्र गट मदत करत होता; परंतु रेनेगडे गटाने युद्धातून माघार घेतली असली तरी त्यावर हौथीने मात्र अद्याप काहीही भूमिका जाहीर केलेली नाही. सौदी अरेबियाने मानवी पातळीवर पाच दिवसांचा युद्ध अवकाश घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला रेनेगडेने जाहीर पाठिंबा देताना प्रस्ताव स्वीकारला. संयुक्त राष्ट्रांकडून येमेनमधील स्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. नागरिकांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. सौदी अरेबियाकडून सातत्याने बाँबहल्ले करण्यात येत आहेत. परंतु मानवी पातळीवर युद्धबंदी करणे गरजेचे आहे, असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या वतीने करण्यात आले होते. त्यानंतर या सशस्त्र गटाने हा निर्णय घेतला.

सादाच्या डोंगररांगांत रात्रीही हल्ले
उत्तर सादा हा बंडखोरांचा गड मानला जातो. तो ताब्यात घेण्यासाठी सौदीच्या नेतृत्वाखाली हवाई दलाने जोरदार सलग दुस-या रात्री या भागात हल्ले केले. या संपूर्ण प्रदेशावर हल्ले सुरू झाले.

अमेरिकेचे आवाहन
आपल्या सहकारी संघटनेने युद्धबंदीची तयारी दर्शवल्यानंतर तरी किमान हौथी संघटनेने बंडाची शस्त्रे खाली ठेवली पाहिजेत. शस्त्रसंधी स्वीकारून देशातील जनतेच्या कल्याणाची खरी काळजी आहे, हे दाखवण्याची हौथींना संधी आहे, असे सौदीचे परराष्ट्रमंत्री अब्दुल अल जुबैर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.

रेनेगडे गट सालेह होता समर्थक
२०१२ पूर्वी सालेह सरकार होते. त्यावेळी त्यांचा समर्थक म्हणून रेनेगडे सशस्त्र गट सक्रिय होता. त्यानंतर हौथींच्या बंडाला या गटाने पाठिंबा दिला. हौथीला इराणकडून पाठिंबा आहे.

१४,४०० जणांचा मृत्यू
येमेनमध्ये सौदी आणि हौथी यांच्यातील संघर्षात आतापर्यंत १४ हजार ४०० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या वतीने करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...