आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका: टेक्सासमध्‍ये भयानक पूर, 12 जणांचा मृत्यू, हजारो बेघर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक्सासच्या कोहुलिया शहरात चक्रीवादळानंतरचे दृश्‍य - Divya Marathi
टेक्सासच्या कोहुलिया शहरात चक्रीवादळानंतरचे दृश्‍य
सेंट अँटोनिओ - अमेरिकेच्या टेक्सास शहरात मुसळधार पावसानंतर आलेल्या पूरात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबोटने मंगळवारी(ता.26) वादळ, मुसळधार पाऊस आणि पूरामुळे हजारो लोकांनी शहरातून पलायन केले आहे. वादळ सुरुच आहे. पाऊसामुळे नद्यांच्या पाण्‍याची पातळी वाढली आहे. ब्लान्को नदी आणि टेक्सोमा सरोवरात पाण्‍याची पातळी खूप वाढली आहे.
हेज आणि बिम्बरले प्रांतात पूराने सर्वाधिक नुकसान केले आहे. बिम्बरलेत तीन लोक बेपत्ता असून मोठ्याप्रमाणावर इमारती कोसळल्या आहेत. सततच्या पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे, असे अधिका-यांनी सांग‍ितले. 1 हजार 200 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. राष्‍ट्रीय हवामान सेवाच्या अंदाजानुसार नदीचा प्रवाह 43 फुटांपर्यंत जाऊ शकते. पुढील सात दिवसांत वादळ येण्‍याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा टेक्सासमध्‍ये आलेल्या पूरानंतरची स्थिती ...