आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळ मोहिमेसाठी किशोरवयीनांच्या नवयोजना;प्रकल्पाला अमेरिकेत मिळाला मोठा प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- नासाने मंगळयानाविषयी उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांकडून कल्पना मागवल्या होत्या. अमेरिकेच्या विविध संस्थांनी नासाच्या या प्रकल्पाला उदंड प्रतिसाद दिला. पैकी उपयोजित नावीन्यपूर्ण कल्पनांची निवड यातून करण्यात आली आहे. वर्ष २०२० च्या मंगळ मोहिमेसाठी हा प्रकल्प नासाने राबवला. टीनएजर्सनी या मोहिमेसाठी आपल्या कल्पना सादर करण्याचे आवाहन नासाने केले होते. पुढच्या मोहिमेत मंगळयान ग्रहाच्या कोणत्या भागात उतरवावे याविषयी मतेही नासाने जाणून घेतली.

वर्ष २००४ मध्ये स्पिरिट हे यान ज्या ठिकाणी उतरवण्यात आले तिथेच आगामी यानही उतरवावे, असे मत अॅलेक्स लोंगो याने आपल्या प्रस्तावात मांडले. गुसेव्ह कार्टर नामक स्थानावर हे यान उतरवले होते. कधीकाळी मंगळावर जीवसृष्टी होती असा निष्कर्ष स्पिरिटच्या पाहणीतून आला. याच तर्काच्या आधारे दिशेने पुढील मोहीम राबवावी गुसेव्ह कार्टरवर लँडिंग करावे, असे मत अॅलेक्स लोंगोने व्यक्त केले. लोंगो उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षण घेत आहे.
नासाच्या या प्रकल्पासाठी आलेल्या विविध प्रस्तावांपैकी टीनएजर्सचे प्रस्ताव सेमीफायनलसाठी निवडण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी अंतिम निवड झालेल्या प्रस्तावांची घोषणा होणार आहे.

अॅलेक्सला नासाचे निमंत्रण
फर्स्ट लँडिंग साइट परिषदेचे आयोजन नासाने केले असून यात गुसेव्ह कार्टर या स्थानाविषयी चर्चा होणार आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी नासाने अॅलेक्सला निमंत्रित केले आहे. परिषदेच्या शेवटच्या सत्रात अॅलेक्स दिग्गज संशोधकांसमोर आपली बाजू मांडेल. १२५ पीएचडी पदवीधर विद्यार्थ्यांची उपस्थिती या परिषदेला असणार आहे. त्या तुलनेत मी अनुभव ज्ञानाच्या बाबतीत लहान असल्याचे अॅलेक्स म्हणतो. मला थोडी भीती वाटत आहे अशी भावना त्याने व्यक्त केली. पूर्वीच्याच स्थानकावर आगामी मोहीम राबवण्याच्या बाजूने मत मांडणाऱ्या संशोधकांच्या चमूत त्याला सामील करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...