आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूलिकणांच्या अतिरेकामुळे मुदतपूर्व प्रसूती, ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूयॉर्क शहराचा केला अभ्यास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या परिसरात धुळीचे प्रमाण वाढले असून माता व नवजात अर्भकाच्या प्रकृतीवर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. हवामानातील वाढत्या धूलिकणांमुळे मुदतपूर्व प्रसूती आणि जन्माच्या वेळी अर्भकाचे कमी वजन भरणे यासारख्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. नवी दिल्लीमध्ये देखील धूलिकणांचे असे परिणाम दिसून येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क सीटीमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर्स दहशतवादी हल्ल्यात जमीनदोस्त झाले. त्यानंतर या संपूर्ण परिसरात धूलिकणांचे प्रमाण वाढले. आभ्राच्छादित वातावरणात तर याची तीव्रता अधिक जाणवते.
  
झुरीच विद्यपीठ आणि अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठाने वर्ष १९९४ ते २००४ दरम्यान जन्मलेल्या अर्भकांच्या माहितीचे संकलन केले. या कालावधीत १.२ दशलक्ष प्रसूती झाल्या. लोअर मॅनहटन व परिसरातील गर्भवतींच्या आरोग्य तपशीलाचेही विश्लेषण करण्यात आले. या भागात धुळीचे प्रमाण सर्वाधिक आहे.  

निम्म्यापेक्षा अधिक प्रसूती झाल्या मुदतपूर्व
९/११ च्या हल्ल्यावेळी ज्या महिला तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या त्यातील ५०% पेक्षा अधिक महिलांची  प्रसूती मुदतपूर्व होती. अनेक अर्भकांचे वजन कमी भरले. यांना पुढे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब असल्याचेही निष्पन्न झाले.  गर्भात असताना मातेचा दूषित हवेतील वावर यास कारणीभूत आहे. गर्भामधील भ्रूणाच्या श्वसनावरदेखील याचे 
दूरगामी परिणाम दिसून येतात, असे नॅशनल जिआेग्राफिकच्या अहवालात म्हटले आहे.  

गर्भावस्थेतील स्थिती दूरगामी परिणामकारक  
झुरिच विद्यापीठाचे संशोधक हॅन्स शेत्झवांट यांच्या मते गर्भावस्थेतील मातेची स्थिती अर्भकाच्या संपूर्ण आयुष्याला प्रभावित करते. मुलांचा आर्थिक विकास, शारीरिक वाढ यावर याचा बरा-वाईट परिणाम दिसून येतो. नवी दिल्ली, मेक्सिको सिटी, बीजिंग या महानगरांचाही संशोधनात आढावा घेण्यात आला.
 
बातम्या आणखी आहेत...