आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या यादीतून नाव वगळा, तालिबानची अट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोहा / पेशावर - अफगाणिस्तानात१५ वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराला थांबवण्यासाठी शांती चर्चेस तालिबान पाकिस्तानने तयारी दर्शवली आहे, परंतु त्यासाठी दहशतवादी संघटनेने एक अट घातली आहे. संयुक्त राष्ट्राच्या ब्लॅकलिस्टमधून संघटनेचे नाव वगळण्यात यावे, अशी अट तालिबानने घातली आहे. संयुक्त राष्ट्राने तालिबानला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.

तालिबान पाकिस्तानच्या राजकीय गटाच्या काही लोकांनी कतारमधील काही खासगी फोरमशी चर्चा केली. कारण गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही तालिबानच्या हातून हेलमंड प्रांत सरकारच्या ताब्यात गेला आहे. शांती चर्चेसाठी संघटनेची सशर्त तयारी आहे, परंतु त्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या काळ्या यादीतून नाव वगळण्यात यावे. बंदी उठवण्यात यावी, असे तालिबानच्या एका म्होरक्याने म्हटले आहे. संपत्तीवरील बंदी हटवावी.