आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या आनंदासाठी पुन्हा पदवी प्रदान समारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) - अमेरिकेच्या एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राच्या आनंदासाठी पुन्हा एकदा पदवी प्रदान समारंभाचे आयोजन केले. महाविद्यालयालाही हे आयोजन करणे कठीण झाले होते. परंतु आपला मित्र स्कॉटच्या आनंदासाठी त्याच्या वर्गमित्रांनी पुन्हा एकदा पदवीचे गाऊन आणि टोप्या घातल्या. पुन्हा तीच वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला.

महाविद्यालयाच्या अधिकृत पदवी प्रदान समारंभाच्या दिवसापूर्वीच विद्यार्थी स्कॉट डॉनच्या कारला अपघात झाला. यात स्कॉट गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान कोमात गेला. हा अपघात मे महिन्यात झाला होता. आठवडाभरापूर्वी तो कोमातून उठला. आपण महाविद्यालयाच्या पदवी प्रदान समारंभात सामील होऊ शकलो नाही याचे त्याला दु:ख होते. त्याच्या सर्व मित्र व शिक्षकांना त्याची उणीव भासली.

दोन दिवसांपूर्वी मॅकएलिस्टरव्हिलेच्या ईस्ट जुनाइटा हायस्कूलचे प्राचार्य बेंजामिन फॉसे स्कॉटला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यांनी स्कॉटला सांगितले की महाविद्यालयाने त्याच्यासाठी सरप्राइज ठेवले आहे. दुसऱ्या दिवशी स्कॉट तिथे गेला. त्याच्या वर्गातील बहुतांश मित्र तेथे उपस्थित होते. त्यांनी पदवीचा गाऊन व टोपी घातली होती. स्कॉटलाही आैपचारिक पोशाख देण्यात आला. व्यासपीठ सजवले होते. त्याच्या मित्रांनी हुबेहूब वातावरणनिर्मितीसाठी आटोकाट प्रयत्न केले. त्याच्या मित्रांनी स्कॉटचे प्रोसेशन काढले. त्याला स्टेजवर नेले. स्कॉटला डिप्लोमा देण्यासाठी त्याचे नाव पुकारले गेले. तो अभिमानाने स्टेजकडे गेला. त्याला पदवी देताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच्या मित्रांनी चिअरअप केले व त्याचा उत्साह वाढवला. वातावरणात महाविद्यालयीन वातावरणाची एक खुमारी पाहायला मिळत होती. तोच उत्साह सर्वत्र पाहायला मिळत होता. पदवी दान समारंभाची काही उणिव राहून जाऊन नये म्हणून त्याचे जीवलग मित्र स्टेजवर गेले. त्यांनी स्कॉटला घेरले व सर्वांनी आपल्या टोप्या हवेत उडवल्या. स्कॉटला उचलून घेतले. त्याला घेऊन संपूर्ण सभागृहात चक्कर मारली. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचाही चमचमाट झाला. स्कॉटच्या शिक्षकांच्या साक्षीने हा पदवी प्रदान समारंभ उत्साहात पार पडला.
बातम्या आणखी आहेत...