आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 व्या न्यूक्लियर टेस्टसाठी उत्तर कोरिया सज्ज; युद्धाची परिमाणाकारकता दाखवून देऊ: हुकुमशहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- उत्तर को‍रिया सहाव्या न्यूक्लियर टेस्टसाठी (अण्वस्र चाचणी) पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पुंगगाय-री साइटवर ही चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती '38 नॉर्थ मॉनिटरिंग ग्रुप'ने दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोरियातील पेनिनसुलामध्ये (प्रायद्वीप) तणाव वाढला आहे.

ग्रुपने दिलेली माहिती अशी की, न्यूक्लियर टेस्टसाठी उत्तर कोरियाने साइटवर पूर्ण तयारी झाली आहे. कोरियन लष्कर पुन्हा एकदा सज्ज आहे. हल्ला करणार्‍यांना आम्ही युद्धाची परिणामकारकता काय असते, ते दाखवून देणार असल्याचे उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग-उन यांनी सांगितले आहे.
- न्यूज एजन्सीनुसार, '38 नॉर्थ मॉनिटरिंग ग्रुप' ही उत्तर कोरियाशी संबंधित एक अॅनालिसिस वेबसाइट आहे.
- उत्तर कोरियातील पुंगगाय-री अर्थात न्यूक्लियर टेस्ट साइटवर 12 एप्रिलपासून वारंवार हलचाली होत असल्याचे सॅटेलाइट फोटोज दर्शवत आहेत. येथील कमांड सेंटरजवळ मोठ्याप्रमाणात बंदोबस्त आहे.
- गेल्या काही महिन्यांपूर्वी उत्तर कोरियाने बॅलिस्टिक मिसाइल टेस्ट केली होती. काही मिसाइल सी ऑफ जपानमध्ये दागण्यात आली होती.

उत्तर कोरियाचे फाउंडर किम II-सुंग यांचीजयंती...
-  उत्तर कोरियाचे फाउंडर किम II-सुंग यांची 15 एप्रिलला 105 वी जयंती आहे. उत्तर को‍रिया या दिवशी न्यूक्लियर टेस्ट घेण्याची शक्यता आहे.
- उत्तर कोरियाच्या टनलमध्ये एक न्यूक्लियर डिव्हाइस ठेवले आहे. येत्या शनिवारी ते ब्लास्ट करण्याची शक्यता असल्याचे 'व्हाइस ऑफ अमेरिका' ने यूएस अधिकार्‍यांच्या हवाल्याने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...