आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप; महिलेने सांगितली आपबीती, 660 कोटींचा खटला दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकन अध्‍यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. ही घटना 1994 मध्‍ये घडली असून तेव्हा ती महिला 13 वर्षांची होती. त्यावेळी ट्रम्प आणि त्यांचे अब्जाधीश मित्रांनी मिळून तिचा शारीरिक छळ केला. तिला चार महिने ओलिस ठेवण्‍यात आले होते. पीडित महिलेने 660 कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. स्वत: पीडित महिला समोर आली, दाखल केला खटला...

- पीडित महिलेने मंगळवारी सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ कॅलिफोर्नियामध्‍ये खटला दाखल केला.
- प्रसारमाध्‍यमांच्या वृत्तानुसार, महिलेने आपले नाव केट जॉन्सन असे सांगितले आहे. न्यायालयात ती आपल्या स्वत:ची बाजू मांडणार असल्याचे चर्चा आहे.
- केटने पोलिसांना सांगितले, की ही घटना जून ते सप्टेंबर 1994 दरम्यानची आहे.
पीडित महिला म्हणाली, सेक्स पार्टीत करायचे आक्षेपार्ह वर्तन
- पीडित म्हणाली, ट्रम्प आणि त्यांचे अब्जाधीश मित्र जेफ्री अप्सटाइन यांनी मॉडलिंगमध्‍ये करिअर बनवून देण्‍याचे आश्‍वासन देऊन तिच्यावर शारीरिक छळवणूक केली.
- नंतर तिला धमकी देऊन तिचा वापर केला जात असे. तेव्हा तिचे वय 13 वर्ष होते.
- तिला अप्सटाइनच्या न्यूयॉर्क येथील घरावर बोलवले जात होते. येथे हे लोक सेक्स पार्टी करायचे.
- या पार्टीत ट्रम्पही राहायचे. ट्रम्प यांनी अनेक वेळो तिच्याशी गैरवर्तन केले होते.
- एकदा दोघांनी तिला ' सेक्स स्लेव्ह' म्हणून चार महिन्यांपर्यंत ओलिस ठेवले होते.
- केटने ट्रम्पवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्‍यानुसार ती ट्रम्पला दुस-या वेळेस सेक्स पार्टीत भेटली होती.
- या दरम्यान ट्रम्पने तिच्यावर बलात्कार केला होता.
पुढे वाचा, ट्रम्प काय म्हणाले