आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Researchers From The London School Of Economics Claims, Happiness Depends On Mental Health, Not Money!

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संशोधनात दावा , आनंद मानसिक आरोग्यावर अवलंबून, पैशावर नव्हे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन : पैशामुळे आनंद निर्माण होतो, अशी मानसिकता दिवसेंदिवस बळावत आहे. मात्र आनंदाचा सेंसेक्स फक्त आणि फक्त मानसिक वृत्तीशी निगडित आहे, असा दावा संशोधकांनी केलाय. नातेसंबंधातील चढउतार आणि मानसिक अनारोग्य मानवी दु:खाचे मूलभूत स्रोत असल्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने केलेल्या संशोधनात सिद्ध झाले. नैराश्य, अस्वस्थता यांच्यात घट करायची असेल तर सरकारने गरिबी निर्मूलन धोरण राबवून ते साधेल याची शाश्वती केवळ ५% आहे. मात्र नातेसंबंध दृढ असल्यास २० % दु:ख हलके झाल्याचे या संशोधनात केलेल्या निरीक्षणाने ध्यानात आले.

गेल्या ५० वर्षांत सरासरी उत्पन्नात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. मात्र त्यामुळे बहुसंख्य लोक आनंदी झाले असल्याचे चित्र मुळीच नाही. संशोधक रिचर्ड लेयार्ड यांनी ‘आेरिजिन्स ऑफ हॅपिनेस’ नावाने हा संशोधन अहवाल सादर केला. लंडन कॉन्फरन्समध्ये त्यांनी आपल्या या शोधनिबंधाचे सादरीकरण केले. लोकांची गरिबी दूर करण्याचे धोरण आखण्याऐवजी सरकारने नैराश्य व अस्वस्थता निर्मूलनाचे धोरण आखावे, अशी सूचना रिचर्ड यांनी या कॉन्फरन्समध्ये केली.

राज्याच्या संस्था महत्त्वपूर्ण
शासनाद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळा व इतर आस्थापनांमध्ये नैराश्य दूर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. अस्वस्थता व नैराश्याच्या कारणांवर शाळेच्या पातळीवर काम झाले तर आनंदाचा सेन्सेक्स निश्चितच वाढेल, असा विश्वास संशोधक रिचर्ड लेयार्ड यांनी व्यक्त केला. संपत्ती निर्माणापेक्षाही कल्याणकारी निर्मितींविषयी संस्कार महत्त्वाचे आहेत. शाळेतील वातावरणाचा मुलांच्या मानसिक घडणीत मोठा वाटा असल्याने येथून हे प्रयत्न झाले पाहिजेत, अशी सूचना त्यांनी केली.
दरडोई उत्पन्नाची छाननी
प्रत्येक व्यक्तीच्या आनंदाची पातळी शोधत असताना त्यात मानसिक आणि सामाजिक घटक अधिक प्रभावी दिसून आले. सामाजिक परिस्थिती कुंठित असेल तर व्यक्ती पैशाला सर्वस्व मानते, असे यात संशोधकांनी नोंदवले. यात उत्पन्नाचा भाग महत्त्वाचा असला तरीही तो सर्वात मोठे कारण ठरलेला नाही, असे ५ दशकांचे निरीक्षण केल्यावर दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...