आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reunion Of North And South Korian Families Separated During War

LOVE STORY : 65 वर्षांनंतर पतीला पाहून पत्नी म्हणाली, जीवंत राहण्यासाठी धन्यवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
85 वर्षांची ली सून क्यू, यांच्यासह तिचे 83 वर्षीय पती ओह सी-इन. दोघांनी एकमेकांना 65 वर्षांपूर्वी पाहिले होते. - Divya Marathi
85 वर्षांची ली सून क्यू, यांच्यासह तिचे 83 वर्षीय पती ओह सी-इन. दोघांनी एकमेकांना 65 वर्षांपूर्वी पाहिले होते.
सेऊल - 6 दशकांपूर्वी कोरियन वॉरमुळे विभक्त झालेल्या अनेक नॉर्थ आणि साऊथ कोरियातील कुटुंबे मंगळवारी एकमेकांना भेटली. दक्षिण कोरियातील 400 व्यक्तींना उत्तर कोरियाच्या माऊंट कुमगँग रिसॉर्टमध्ये आणण्यात आले होते. त्याठिकाणी ते सर्व आपल्या म्हाताऱ्या नातेवाईकांना भेटले. या भेटणाऱ्यांमध्ये 85 वर्षांची आजीबाई ली सून-क्यू देखिल होती. त्यांनी 83 वर्षीय नवरा ओह सी-इनला अखेरचे 65 वर्षांपूर्वी पाहिले होते. या भेटीनंतर ली सून क्यू तिच्या पतिला एक वाक्य बोलली. ते म्हणजे जिवंत राहण्यासाठी धन्यवाद.

65 वर्षांचा मुलगाही आला
सून क्यूने मंगळवारी पहिल्यांदाच जेव्हा तिच्या पतीला पाहिले तेव्हा तिला काय बोलावे ते सुचतच नव्हते. फोटोग्राफत एकापाठोपाठ एक त्यांचे फोटो काढत होता. ली यांनी एक पारंपरिक कोरियन ड्रेस परिधान केला होता. तर त्यांचे पती ओह सी-इन यांनी सूट आणि हॅट असा पोषाख केला होता. त्यांनी केवळ सून यांचा हात हातात घेतला आणि बराच वेळ पाहतच राहिले. या दरम्यान दोघांचा 65 वर्षीय मुलगा ओह जँग क्यूनदेखिल त्याठिकाणी होता. ओह बराचवेळ आपल्या मुलाचा आणि पत्नीचा हात पकडून बसून होते. मुलाने जेव्हा प्रथम ओह यांना पाहिले तेव्हा तो ओरडून एकच शब्द बोलू शकला तो म्हणजे, 'फादर'. त्यानंतर त्याने त्यांना दंडवत घातला. ही कोरियाची परंपरा आहे. नंतर उठून वडिलांना मिठी मारली.

पतीला घड्याळ केले भेट
दोघांनी एकमेकांना अखेरचे सप्टेंबर 1950 मध्ये पाहिले होते. त्यावेली ली सूनचे वय 19 वर्षे होते. ती त्यावेळी सहा महिन्यांची गर्भवती होती. कोरियन वॉरमुळे दोघे विभक्त झाले होते. वेगळे झाल्यानंतर ती जुन्या घरातच राहिली. दुसरा विवाहदेखिल केला नाही. त्यांना पतीला एक दिवस तरीभेटणार अशी अपेक्षा होती. पतिसाठी भेट म्हणून त्यांनी सोन्याची घड्याळ आणली होती. त्यावर दोघांची नावे लिहिलेली होती. भेटीसाठी आलेल्या इतर कुटुंबांनीही एकमेकांना भेटवस्तू रोख रक्कम दिली. यावेळी शेकडो पत्रकारांचीही उपस्थिती होती.

आणखी कोण-कोण भेटले ?
>98 वर्षांच्या कू सँग-यून त्यांच्या दोन मुलींना (71 वर्षांची सुंग-जा आणि 68 वर्षांची सुन-ओक) भेटल्या. त्यांनी दोघींसाठी पारंपरिक लाल बूट आणले होते. सप्टेंबर 1950 मध्ये दोन्ही मुसी सात आणि चार वर्षांच्या होत्या त्यावेळी त्या आई वडिलांपासून विभक्त झाल्या होत्या. आईने त्यांना लहानपणी हे बूट देण्याचे आश्वासन दिले होते. 70 वर्षांनंतर त्यांनी हे वचन पूर्ण केले.
>साऊथ कोरियाचे 65 वर्षांचे चाइ ही यंग त्यांच्या 88 वर्षांचे नॉर्थ कोरियन वडील चाइ हून सिक यांना भेटले. सिक यांनी त्यांच्या मुलाला तो अवघा एक वर्षाचा असताना अखेरचे पाहिले होते.
>या रियुनियनमध्ये बहुतांश वृद्ध हे व्हीलचेअरवर आले होते. सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू झळकत होते.

रियुनियन म्हणजे काय?
>50 च्या दशकात कोरियन वॉरमुळे लाखो कुटुंबे विभक्त झाली होती. गेल्यावर्षी दोन्ही देशांचे फॅमिली रियुनियन सुरू करण्याबाबत एकमत झाले. असेच एक रियुनियन गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झाले होते. यावेळी रियुनियनसाठी 96 कुटुंब निवडण्यात आली होती.
>या रियुनियनचे फोटो आणि व्हिडीओ संपूर्ण साऊथ कोरियामध्ये दाखवण्यात आले. नॉर्थ कोरियाने मात्र तसे केले नाही. हे फोटो आणि व्हिडीओ दाखवल्यास जनतेवरील पकड कमजोर होईल या भितीने त्यांना बातम्या दाखवल्या नाहीत.
>साऊथ कोरियामध्ये लॉटरी सिस्टीमद्वारे कुटुंबांची निवड केली जाते. तर नॉर्थ कोरियामध्ये सत्ताधाऱ्यांच्या जवळच्यांना प्राधान्य दिले जाते.
>साऊथ कोरिया अनेक दिवसांपासून वारंवार रियुनियन आणि त्यातील कुटुंबांची संख्या वाढवण्याचा आग्रह करत आहे. तर नॉर्थ कोरिया फार क्वचितच त्यासाठी तयारी दाखवतो. तज्ज्ञांच्या मते याद्वारे ते दक्षिण कोरिया सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
>युद्धानंतर साऊथ कोरियातील सुमारे 1 लाख 30 नागरिकांनी भेटीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी अर्ध्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

इतिहास...
>कोरियावर जपानने 1910 मध्ये ताबा मिळवला होता. 1945 मध्ये जेव्हा दुसरे महायुद्ध संपले तेव्हा जपानने माघार घेतली. त्यानंतर कोरियाची युनायटेड स्टेट्स आणि सोव्हीएत युनियन अशा दोन झोनमध्ये विभागणी करण्यात आली.
>नॉर्थ झोनवर सोव्हीएतचा ताबा होता. तर साऊथ झोनवर अमेरिकेचा. दोन्ही झोन पुन्हा एक करण्यासाठीची चर्चाही निष्फळ ठरली.
>1948 मध्ये दोन्ही झोनमध्ये वेगवेगळे सरकार स्थापन झाले. नॉर्थ जोनमध्ये डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया आणि साउथमध्ये रिपब्लिक ऑफ कोरिया.
>नॉर्थ कोरियाने साउथवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोरियन वॉर (1950–53) झाली. त्यानंतर शस्त्रसंधीचा करार झाला. 1991 मध्ये युनायटेड नेशन्सने दोन्ही देशांना मान्यता दिली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS