आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडमध्ये धान हंगामाची सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक- थायलंडमध्ये बुधवारी धान हंगामाची पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. दर हंगामात पांढऱ्या रंगाच्या बैलांना मान दिला जातो. पिकांचा मनासारखा उतारा यावा म्हणून पांढरे बैल शेतकऱ्यांच्या दृष्टीने शुभ मानले जातात. सानाम लाँग येथे शाही नांगरणी झाली. पौरोहितांच्या उपस्थितीत हा शाही कार्यक्रम केला जातो. पांढऱ्या बैलांना हंगामाच्या निमित्ताने अधिक मान असतो. त्यासाठी त्यांची खास बडदास्त ठेवण्यात येते. मिष्टान्नासह सात प्रकारच्या भोजनाचा आनंदही बैलाना दिला जातो. हा उत्सव पाहून भारतातील पोळा सणाची आठवण होते.