आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैज हारल्याने या अब्जाधिश उद्योगपतीला बनावे लागले होते एयरहोस्टेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैज हारल्यानंतर एयरहोस्टेस बनलेला रिचर्ड.... - Divya Marathi
पैज हारल्यानंतर एयरहोस्टेस बनलेला रिचर्ड....
इंटरनॅशनल डेस्क-  जगातील प्रसिद्ध कंपनी व्हर्जिन अटलांटिक एयरलाईन्सचा मालक सर रिचर्ड ब्रॅनसन एखाद्या सेलिब्रिटीला कमी नाही. व्हर्जिन ग्रुपच्या 400 कंपन्यांचा मालक असलेला रिचर्ड ब्रॅनसन वर्ष 2012 मध्ये मुंबईतील रस्त्यावर देखील नाचताना-गाताना दिसला होता. त्यावेळी तो येथील व्हर्जिन अटलांटिक कंपनीची मुंबई-लंडन फ्लाईटला री-लॉन्च करायला पोहचला होता. मस्तीखोर रिचर्ड आपल्या ड्रामेबाजीने नेहमीच चर्चेत राहतो. रिचर्डचा जन्म 18 जुलै 1950 रोजी झाला होता. याचनिमित्ताने आज आम्ही तुमच्याशी त्याच्या लाईफस्टाईलबाबत सांगणार आहोत. पैज हारल्यावर बनला होता एयरहोस्टेस...
 
- काही वर्षापूर्वी तो एयर एशियाच्या एका फ्लाईटने पर्थ ते क्वालालांपूर पर्यंत एयर होस्टेस बनून ड्रिंक सर्व्ह करताना दिसला होता. 
- रिचर्डला असे यासाठी करावे लागले कारण, तो एयर एशियाचे प्रमुख टोनी फर्नाडिंस यांच्यासोबत पैज हारला होता. 
- खरं तर, 2010 मध्ये अबुधाबीत झालेल्या फॉर्म्यूला वन ग्रॅंड प्रिक्सच्या दरम्यान रिचर्ड आणि टोनी यांच्यात पैज लागली की, ज्याची टीम हारेल त्याने दुस-याच्या एयरलाईन्समध्ये एयर होस्टेस बनून ड्रिंक सर्व्ह करायची.  
- रिचर्ड पैज हारला आणि प्रामाणिकपणे आपले आश्वासन पूर्ण केले.  यावेळी त्याने मस्ती करताना चेष्टेने टोनी यांच्या अंगावर ड्रिंक्सचा ट्रे सांडला होता. 
 
कोण आहे रिचर्ड ब्रॅनसन-
 
- अमेरिकन बिजनेसमॅन रिचर्ड ब्रॅनसन व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक आहेत. 
- त्यांच्या ग्रुपच्या एकून 400 कंपन्या आहेत. एयरलाईन्स, टेलिकॉम, स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल्स, हॉटेल्ससह अनेक क्षेत्रात त्यांचा व्यवसाय आहे. 
- त्यांच्या कंपन्यांची किंमत 5.2 बिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. 
- 67 वर्षाचे रिचर्ड अलिशान लाईफस्टाईलसाठी अमेरिकेत प्रसिद्ध आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रिचर्डशी संबंधित अशीच रोचक माहिती......
बातम्या आणखी आहेत...