आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rift In Taliban, Opposition Group Of Mansoor Fall Out

तालिबानमध्ये प्रथमच फूट, मन्सूरविरोधी गट संघटनेबाहेर, शांतता चर्चा धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बकवाह (अफगाणिस्तान) - दहशतवादी कारवायांत स्वत:ला सर्वांत कट्टर संघटना म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालिबान संघटनेत मोठी फूट पडली असून एक गटाने बाहेर पडून नवा नेता निवडला आहे. मुल्ला अख्तर मन्सूरच्या नेतृत्वाखालील तालिबानमध्ये पडलेली ही पहिली अधिकृत फूट आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे तालिबानशी सुरू असलेल्या शांतता चर्चेमध्ये नवी बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे.

फुटीरवादी गटाचा नेता म्हणून मुल्ला रसूल याची निवड करण्यात आली असून अफगाणमधील अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फराह प्रांताच्या एका भागात या गटाची बैठक होत आहे. गेल्या जुलैमध्ये मुल्ला ओमरचा मृत्यू झाल्यानंतर तालिबानमध्ये चळवळीच्या नेतृत्वावरून सुंदोपसुंदी सुरू होती. हा फुटून निघालेला गट मूळ संघटनेइतका पाठिंबा मिळवण्यात यशस्वी होईल किंवा नाही, याबद्दल या विषयाचे अभ्यासक साशंक आहेत.

मन्सूर आमचा नेता होऊच शकत नाही, असे रसूल नामक एका तालिबानी उपनेत्याने दहशतवाद्यांच्या एका बैठकीत नुकतेच जाहीर केले आहे. मन्सूरची निवड अधिकृतरीत्या झालेली नाही. त्याचे नेतृत्व संघटनेवर लादण्यात आले असल्याचे रसूल याचे म्हणणे आहे. तालिबानचे वर्षानुवर्षे नेतृत्व करणाऱ्या मुल्ला ओमरचा मृत्यू झाल्याचे उन्हाळ्यात जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून संघटनेचे नेतृत्व कुणाकडे सोपवले जाणार हा प्रश्न होता. यादरम्यान मन्सूर याच्याकडे संघटनेचे नेतृत्व दिल्याचे जाहीर करण्यात आले.