आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rihanna Found This Indian Girl On Instagram And Made Her FAMOUS!

पॉपस्टार रिहानाच्या एका मॅसेजने बदलले या NRI तरुणीचे जीवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला जर जगप्रसिद्ध गायिका रिहानाचा इन्स्टाग्रामवर मॅसेज आला तर काय, असा विचार करा. नेमके हेच घडले अप्रवासी भारतीय कलाकार असलेल्या सनम बरोबर. ती रिहानाच्या आगामी व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्यासाठी रिहानाने तिच्याबरोबर कॉन्ट्रॅक्टही केला आहे. त्यामुळे सध्या इंटरनेटवर सगळीकडे या तरुणीची चर्चा आहे.
रिहाना तिच्या व्हिडिओसाठी एका वेगळ्या लूकच्या तरुणीच्या शोधात होती. तिच्या व्हिडिओमध्ये खलनायिकेचे काम करण्यासाठी ती तरुणी शोधत होती. हा शोध सुरू असतानाच तिने सनमचे इन्स्टाग्राम प्रोफाइल चाळले. त्यावेळी तिला सनमचे फोटो आवडले. त्यामुळे तिने सनमला त्याच अकाऊंटवर एक मॅसेज केला. त्यात तिला व्हिडिओची ऑफर देण्यात आली होती. त्यामुळे एका रात्रीत सनम अक्षरशः सेलिब्रिटी बनली.

You tube वर आतापर्यंत सुमारे 1.8 कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पण तिला अजूनही आपल्या नशिबावर विश्वास बसत नाही. सध्या ती सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात व्यस्त आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सनमचे काही PHOTO