आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनीचे कडे भेदणार ‘रिंग ग्रेझिंग ऑर्बिट’ मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - नासाचे कॅसिनी नामक अवकाश यान शनी ग्रहाच्या कड्याजवळ जाणार आहे. यापूर्वी इतक्या जवळ जाण्यासाठी अभियान आखले गेले नव्हते. शनीची अत्यंत जवळून छायाचित्रे या यानाद्वारे टिपण्याची योजना आहे. ३० नोव्हेंबर ते २२ एप्रिलपर्यंत कॅसिनी शनीला प्रदक्षिणा घालेल. शनीच्या समांतर व दोन्ही ध्रुवांभोवती अशा या प्रदक्षिणा असतील. दर सात दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण होणे अपेक्षित आहे. कड्याच्या बाहेरच्या किनाऱ्याजवळून हे यान फिरेल. एकूण २० प्रदक्षिणा हे पूर्ण करेल.
शनी ग्रहाचे विषुववृत्त व गोल कड्यांचे अध्ययन या मोहिमेत करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरनंतर शनीचा चंद्र असलेल्या टायटनजवळून यान जाईल. त्यानंतर या अवकाश मोहिमेतील खरा उत्कंठावर्धक टप्पा सुरू होईल. १९९७ मध्ये कॅसिनी अवकाशात झेपावले होते. २००४ मध्ये ते शनी ग्रहाच्या कक्षेत पोहोचले. शनीचे चंद्र आणि कडा याविषयी सखोल अध्ययन याद्वारे केले जात आहे.

संपूर्ण प्रवासच नाट्यमय : कॅसिनी यान शनीच्या दिशेने झेपावल्यानंतर आत्तापर्यंत अनेक नाट्यमय प्रसंग घडले. अनेक अद््भुत शोधही लागले. शनीचा उपग्रह असलेल्या एनसेलॉड्सवरील महासागराची छायाचित्रे या यानाने पाठवली. टायटनवरील द्रवरूप मिथेनचा साठाही याद्वारे दिसून आला.
अशा असतील प्रदक्षिणा
पहिल्या दोन प्रदक्षिणा कड्याच्या फिकट बाजूकडून असतील. या परिघावर जानुस व इपिमेथेइस हे शनीचे दोन चंद्र आहेत. मार्च व एप्रिलदरम्यान कड्याच्या गडद भागात यान प्रवेश करेल. याला ‘एफ रिंग’ अशी संज्ञा वापरण्यात येते. एफ रिंगच्या इतक्या जवळ यापूर्वी एकही यान गेलेले नाही. तरीही कड्यापासून यानाचे अंतर ७,८०० किलोमीटर राहील.
बातम्या आणखी आहेत...