आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'River Book Of Richard Hopple News In Divya Marathi

रिचर्ड हॉपलेने नाकाने लिहिली रागाची कविता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिव्हरपूल- लिव्हरपूलच्या रिचर्ड हॉपले यांच्या शरीराच्या कोणत्याही भागावर त्यांच्या मेंदूचे नियंत्रण नाही. ते नीट बोलूही शकत नाहीत. बहुतांश वेळ व्हीलचेअरवरच असतात. त्यांचा आजारच तसा आहे. (सेरेब्रल पाल्सी) तो कोणालाही कुंठित करून टाकतो. रिचर्डचेही तेच झाले. मग वयाच्या एका टप्प्यावर बरोबरीचे तरुण गर्लफ्रेंडचा हात हातात घेऊन फिरताना पाहिल्यावर त्यांना आपल्या लाचारीचा प्रचंड राग आला.
एकेदिवशी घरी बसून कॉम्प्युटरवर काही तरी काम करत होते. तेव्हा मनात काही शब्द गुणगुणू लागले. एक कविता आकार घेत होती. त्यांना त्याची जाणीव झाली. मग ते लिहित गेले. वर्षभरानंतर त्यांचा ‘रिव्हर बुक’ हा कवितासंग्रह बाजारात आला. रिचर्ड आयपॅडवर नाकाने लिहितात. त्यांची बोटे काम करत नाहीत. आता तीच त्यांची गर्लफ्रेंड आहे. आपला राग व्यक्त करण्याचा सर्वात चांगला मार्ग!
‘प्रत्येक कविता अभिव्यक्तीचा स्नॅपशॉटच’
रिचर्ड 41 वर्षांचे आहेत. ते सांगतात, ‘मी धड बोलू शकत नव्हतो, पण मला नेहमीच माझे म्हणणे मांडावे वाटत असे. त्यामुळे आपले म्हणणे मांडण्यासाठी कविताच योग्य माध्यम वाटले. आज प्रत्येक कविता माझ्या अभिव्यक्तीचा स्नॅपशॉट आहे. या प्रवासातही काही कमी अडचणी आल्या नाहीत. आधी मी जुन्या कॉम्प्युटरवर लिहित होतो. विशेष प्रकारचा माऊस व स्टँडर्ड की बोर्डच्या साहाय्याने लिहित होतो, मात्र शरीरावर खूप ताण पडायचा. त्यामुळे एकदा पाठीला मारही लागला. समस्या आणखीच वाढली. मात्र कधीच हार मानली नाही. आयपॅड विकत घेतला. नाकाने लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मग लिहितच राहिलो.’

घराजवळच्या नदीपासून प्रेरणा
लिव्हरपूलमधून वाहणा-या मर्सी नदी किनाऱ्यालगतच्या एल्बर्ट डॉक परिसरात रिचर्ड राहतात. घरापासूनच वाहणारी ही नदी त्यांच्या कवितांची सर्वात मोठी प्रेरणा आहे. खिडकीत बसून जेव्हा ते नदीकडे पाहायचे तेव्हा त्यांच्या डोक्यात कविता रुंजी घालायची. दुसरी प्रेरणा आहे तंत्रज्ञान. त्यामुळेच ते आज या टप्प्यावर पोहोचले आहेत. म्हणून त्यांनी तंत्रज्ञानालाही कवितेचा साज चढवला.