आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धातुशोधक यंत्र घेऊन थेम्सच्या लाटांमधील ‘खजिना’ शोधण्यास उतरतात लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - सामान्यत: नदीकिनारी लोक फिरत असल्याचे, मासेमारी करत असल्याचे किंवा कचरा वेचत असल्याचे चित्र दिसते, पण लंडनच्या थेम्स नदीच्या किनाऱ्यावर लोक ‘खजिना’ शोधत आहेत. त्यांच्या हातात धातुशोधक यंत्र आणि बादल्या असतात. सारा कॅनिजारो यांनी सांगितले की, मी येथे येण्याची दोन कारणे आहेत.
 
पहिले, कदाचित एखादी वेगळी गोष्ट मिळेल आणि दुसरी, तुमची भेट इतिहासाच्या जाणकारांशी होते. गेल्या आठवड्यात हा तुटलेला ‘बर्मिंगहॅम जग’ मिळाला. त्यावर १६००-२० तारीख आहे. पाइपचा तुकडा शोधणारे एडवर्ड सॅडलिंग म्हणाले की, ‘२०० वर्षांपूर्वी एवढे सुंदर पाइप वापरले जात होते, हा विचारच रोमांचित करतो. पाहिजे तेव्हा मोठ्या रकमेत तो विकेन.’ मार्क स्मॉल यांनी सांगितले की, मी माझ्या धातुशोधक यंत्राद्वारे एक जुने नाणे शोधले. ते किमान ३०० वर्षे जुने आहे. नद्यांतून पुरातन महत्त्व असलेल्या वस्तू लोक आधीही शोधत असत, पण काही वर्षांत हा प्रकार वाढला आहे. आता लोक आधुनिक उपकरणांची मदत घेतात.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...