आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे फ्रान्समधील अजब रस्ता, दोन दिवसांतून केवळ 2 तास होतो खुला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोत तुम्ही जो रस्ता पाहत आहात हा रस्ता केवळ एक किंवा दोन तासांसाठीच दिसतो. इतर वेळी हा रस्ता समुद्राच्या भरतीमुळे पाण्याखाली असतो. सगळीकडे पाणीच पाणी असते. हा रस्ता मेनलँडला नोयरमौटियर (Noirmoutier) आइलँडला जोडला जातो. तो फ्रान्सच्या अटलांटिक कोस्टवर आहे. रस्त्याची लांबी 4.5 किमी आहे. फ्रान्समध्ये हा रस्ता 'पॅसेज डू गोइस' (Passage du Gois) नावाने ओळखला जातो. तर फ्रेंचमध्ये 'गोइस'चा अर्थ 'बूट ओले करून रस्ता पार करणे' असा होतो. 1701 साली सर्वप्रथम हा रस्ता नकाशावर दाखवण्यात आला.

4 मीटर खोल पाणी
हा रस्ता पार करणे अत्यंत धोकादायक समजले जाते. एक ते दोन तासांसाठी मोकळा झालेला हा रस्ता अचानक दोन्ही किनाऱ्यांवरून पाणी येऊ लागल्याने पाण्याखाली जातो. त्याची खोली जवळपास 4 मीटरपर्यंत जाते. एका रिपोर्टनुसार या रस्त्यावर दरवर्षी अनेक लोकांचे अपघात होतात.

एकेकाळी केवळ बोट हा एकच पर्याय होता
एकेकाळी याठिकाणी प्रवास करण्यासाठी केवळ बोट हे एकच वाहतुकीचे साधन होते. पण काही वर्षांनंतर बॉरनेउफ (Bourgneuf)च्या खाडीमध्ये गाळ दमा होऊ लागला. त्यानंतर याठिकाणी एक पक्का रस्ता तयार करण्यात आला. एका रिपोर्टनुसार 1840 मध्ये येथे कार आणि घोड्यांच्या माध्यमातून लोकांनी येणे जाणे सुरू केले होते.

'टूर द फ्रान्स' मध्ये समावेश
1986 नंतरपासून येथे एक अजब रेस आयोजित करण्यात येते. 1999 मध्ये या रस्त्याचा वापर 'टूर दी फ्रान्स' (फ्रान्सची प्रसिद्ध सायकल रेस) साठीही करण्यात आला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फ्रान्सच्या या अनोख्या रस्त्याचे PHOTOS