आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robert Pershing Wadlow Was The Tallest Man Who Ever Lived

भेटा इतिहासातील सर्वात उंच व्यक्तीला, वयाच्या पहिल्या वर्षी 3 फुटांनी उंची वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एल्टनमध्‍ये (इलिनॉइस) राहणा-या हेरॉल्ड आणि एडी वाडलॉच्या घरी एका मुलाने 22 फेब्रुवारी 1918 मध्‍ये जन्म घेतला. इतर नवजात मुलांप्रमाणे त्याचे वजन आणि हालचाली दिसत होत्या. त्याचे नाव ठेवले रॉबर्ट. पहिल्या वाढदिवसाला त्याची लांबी 3 फुट 3.5 इंच, तर वजन 45 पाउंड होते. रॉबर्ट इतका वाढत गेला, की आठव्या वर्षी तो आपल्या पित्याहून उंच झाला. 13 वर्षांचा झाल्यावर त्यांची उंची होती 7 फुट 4 इंच इतकी. त्यावेळी रॉबर्ट जगातील सर्वात उंच मुलगा होता. त्याला जायंट ऑफ इलिनॉइसही संबोधले जात होते. मात्र अवघ्‍या 22 व्या वर्षी त्यांना जगाचा निरोप घेतला. त्यावेही त्याची उंची 8 फुट 11.1 इंच होती. रॉबर्टला सर्व म्हणायचे जेंटल जायंट -
- रॉबर्ट बराच शांत आणि समजूदार होता. स्वभावही चांगला होता. यामुळे त्याला लोक जेंटल जायंटही म्हणायचे.
- त्याला छायाचित्रकारी आणि गिटार वाजवायला प्रचंड आवडत असे. या तुलनेत त्याचे दोन्ही हात बरेच लांब होते.
- 1937 मध्‍ये रॉबर्टने जगातील सर्वात उंच व्यक्तीचा विक्रम तोडला. त्यावेळी त्याची लांबी 8 फुट 4 इंच होती.
- माध्‍यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रॉबर्ट रिंगलिंग बदर्स सर्कसबरोबर दौ-यावर केला आणि त्यानंतर चप्पल बनवणा-या कंपनीच्या प्रमोशनसाठी देशभर फिरला.
- या कंपनीने रॉबर्टसाठी खास बूटांची निर्मिती केली होती. त्यांची साईज -37 एए.
पिटुईटरी ग्लँड वाढल्याने उंचीच भर
- रॉबर्टच्या असाधारण उंची मागे त्याच्या शरीरात वाढलेले पिटुईटरी ग्लँड हे होते.
- हळुहळू त्याच्या पायात आणि टाचांमध्‍ये दुर्बलता येऊ लागली. सेन्सेशनच्या अभावाने तो त्रस्त होता.
- जसा जसा तो वाढू लागला तसे त्याला चालायला लेग ब्रेसेस आणि आधाराची गरज पडू लागली.
- 1940 मध्‍ये त्याच्या पायाच्या घोट्याला फोड आला होता. यामुळे त्याला संसर्ग झाला.
- 15 जुलै 1940 रोजी फक्त 22 व्या वर्षी रॉबर्टचा मृत्यू झाला.
दफन करण्‍यासाठी खास शवपेटी तयार करण्‍यात आली -
- मृत्यूच्या 18 दिवसांपूर्वी डॉक्टरने रॉबर्टची उंची मोजली होती. जी 8 फुट 11.1 इंच होती. रॉबर्टचा मृतदेह त्याच्या गावी आणण्‍यात आला आणि 1 हजार पाऊंड वजनाच्या शवपेटीत त्याला दफन करण्‍यात आले. ती खास तयार करण्‍यात आली होती. एल्टनमध्‍ये रॉबर्टची आज एक मूर्ती आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा इतिहासातील सर्वात उंच व्यक्ती असलेल्या रॉबर्टची छायाचित्रे...