आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robot Kills A Man A Volkswagen Plant At Berlin Latest News In Marathi

Volkswagen Car कंपनीत \'रोबोट\'च्या फटक्यात कर्मचारी ठार, प्‍लेटवर आपटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन- जर्मनीतील कार निर्माता कंपनी 'फोक्सवॅगन'मध्ये 'रोबोट'च्या फटक्यात एका कर्मचार्‍याला प्राण गमवावा लागला आहे. 22 वर्षीय कर्मचारी स्वंयचलीत रोबोट मशीनच्या मदतीने काम करत होता. यादरम्यान रोबोटने कर्मचार्‍याला पकडले आाणि त्याला एका मेटल प्लेटवर जोरात आपटले. कर्मचार्‍याचा घटनास्थळी मृत्यू झाला.

फ्रॅंकफर्टपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या बॉनाटाल शहरातील प्लांटमध्ये सोमवारी (29 जून) ही दुर्घटना घडली. परंतु, कंपनीच्या सूत्रांनी दुर्घटनची माहिती बुधवारी (1 जुलै) जाहीर केली. मात्र, मृत कर्मचार्‍यांचे नाव कंपनीने उघड केलेले नाही. मानवी चुकीमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज कंपनीच्या सूत्रांनी वर्तवला आहे.
फोक्सवॅगन कंपनीत काही कामात रोबोट्सची मदत घेतली जाते. मात्र, कर्मचार्‍यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा कोणाविरुद्ध नोंदवावा? असा प्रश्न कायदेतज्ज्ञांना पडला आहे.