आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जगातील सर्वात मोठे विमान होतोय तयार, रॉकेट लॉंच करणे होणार सोपे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भविष्‍यातील अंतराळ विमान असे असेल.

वॉशिंग्टन - जगातील सर्वात मोठ्या विमानाची बांधणी सुरु झाली आहे. रॉक नावाचा हा विमान उपग्रहाला अंतराळ कक्षेत पाठवून हवाई लॉन्च पॅडप्रमाणे काम करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांची कंपनी स्ट्रेटोलॉन्च सिस्टिम विमानाचे डिझाइन तयार करत आहे. अॅलनला उपग्रहासह माणसालाही अंतराळात पाठवायचे आहे. कंपनीनुसार विमान पहिले उड्डाण 2016 मध्‍ये घेईल. परंतु लॉन्च ऑपरेशन 2018 पर्यंत चालू राहणार आहे. केजीईटी 17 वृत्त वाहिनीने प्रथमच याची छायाचित्रे प्रसिध्‍द केली आहेत. छायाचित्रात दोन मोठ्या आकाराचे भाग जोडताना दिसत आहे.

खास वैशिष्‍ट्ये
कॅलिफोर्नियाच्या मोजावे येथे तयार होत असलेल्या या सर्वात मोठ्या विमानाचे वजन 5 लाख 44 हजार 311 किलोग्रॅम असणार आहे. पंखांची लांबी 385 फुट राहणार आहे. सिक्स 747 क्लास इंजिनच्या क्षमतेसह ते 6124 किलोग्रॅम वजनाचे उपग्रह पृथ्‍वीपासून 180 ते 2000 किमीपर्यंत घेऊ शकते. पृथ्‍वीवरुन 30 हजार फुट उंचावरुन क्षेपणास्त्रही प्रेक्षपित केले जाऊ शकते. यामुळे महागडे फ्यूज खर्च करण्‍यापासून स्वातंत्र्य मिळणार आहे.

पुढे पाहा विमानाचे छायाचित्रे...