आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

99 वर्षांच्या रोजर्सने अखेरच्या 5 मीटरमध्ये दम लावून 7 वर्षांनी लहान धावपटूला हरवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबकरकी (अमेरिका) - ही बहुधा सर्वांत असाधारण ६० मीटरची शर्यत ठरली असेल. यात ९९ वर्षांचे ओरविले रोजर्स चॅम्पियन ठरले. त्यांनी ९२ वर्षांच्या डिक्सन हेमफिल यांना हरवले. रोजर्सने अखेरच्या पाच मीटरमध्ये जोर लावला आणि डिक्सनला मागे टाकत शर्यत जिंकली. यूएसए ट्रॅक अँड फील्ड मास्टर्स इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये ९०-९९ वयोगटाच्या शर्यतीत रोजर्स यांनी ६० मीटरची रेस १८.०० सेकंदात पूर्ण केली. डिक्सन यांनी १८.०५ सेकंदाचा वेळ घेतला. दोघांनी या रेसशिवाय २००, ४००, ८०० आणि १६०० मीटरमध्ये सुद्धा सहभाग घेतला. या सर्व शर्यतीत डिक्सनने रोजर्स यांना हरवले. रोजर्स आणि डिक्सन सर्वांत आधी चार वर्षांपूर्वी एका मास्टर्स स्पर्धेत धावले होते. दोघे आता जुलैत लुईसियानात एकत्र धावतील.
 
फोटो फिनिशने चॅम्पियन ठरला
दोन्ही धावपटूंनी एकाच वेळी फिनिश लाइन ओलांडली, असे वाटत होते. निकालासाठी फोटो फिनिशची मदत घेण्यात आली. यात रोजर्सने डिक्सनला सेकंदाच्या ५०० व्या भागाने मागे टाकले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या रोजर्स... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...