आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमारचा हा \'ऐलान कुर्दी\' जीवंत असूनही दुर्लक्षित, सोशल मीडियावर VIRAL

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखलातून मार्ग काढणारे बाळ आणि इन्सेटमध्ये ऐलान कुर्दीचा मृतदेह... - Divya Marathi
चिखलातून मार्ग काढणारे बाळ आणि इन्सेटमध्ये ऐलान कुर्दीचा मृतदेह...
इंटरनॅशनल डेस्क - सागरी किनाऱ्यावर वाहून आलेल्या 3 वर्षीय ऐलान कुर्दीच्या मृतदेहाने साऱ्या जगाचे हृदय पिळवटले होते. सीरियातील शरणार्थी संकटाचा हृदयद्रावक चेहरा म्हणून तो फोटो जगभरात व्हायरल झाला. अनेक देशांनी शरणार्थींवर मावळती भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्रासह युरोपियन संघाला सुद्धा विचार करून शरणार्थींसाठी विशेष धोरण अवलंब करावे लागले. तसाच एक फोटो आता म्यानमारमधून व्यायरल होत आहे. म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांचे दाहक चित्र मांडणाऱ्या या फोटोतील मुलगा जीवंत आहे. तो चिखलातून मार्ग काढत कसा-बसा जमीनीवर येण्याचा प्रयत्न करत होता. 
 

नेमके कुठले आहे हे चित्र..?
- बांग्लादेशच्या कॉक्स बाजारात लागलेल्या शरणार्थी शिबीराजवळचा हा फोटो आहे. त्यामध्ये एक छोटेशे बाळ चिखलातून मार्ग काढून वर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. 
- नदीजवळ चिखलच चिखल पसरले होते. त्यामध्ये तो रेंगाळून जीव वाचण्याचा प्रयत्न करत होता. हा फोटो जगभरात सध्या व्हायरल होत आहे. 
- म्यानमारमध्ये सुरू असलेल्या रोहिंग्या विरोधी अत्याचारानंतर तेथून दररोज हजारो लोक बांग्लादेशच्या सीमेवर येण्याचा प्रयत्न करत आहेत. 
- बांग्लादेशच्या सीमेवर लागलेल्या शरणार्थी शिबीरांमध्ये रोहिंग्या शरणार्थींची संख्या लाखोंमध्ये गेली आहे. 
- त्यापैकीच एक हा मुलगा होता. त्याच्या आई वडिलांबद्दल काही माहिती मिळालेली नाही. 
- म्यानमारमधून पसार होणारे रोहिंग्या याच नदीला ओलांडून बांग्लादेशात जात आहेत. त्या दरम्यान दररोज बोट बुडण्याच्या आणि लोकांच्या मरण्याचे प्रकार सुरू आहेत. 
- नुकतेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन जाणारी नौका उलटल्याने 5 महिन्यांच्या बाळासह अनेकांचा बळी गेला. 
- म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर दहशतवादाचे आरोप लावून लष्कर आणि पोलिस सुद्धा कारवाया करत आहेत. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...