आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोहिंग्या मुस्लिमांना मायदेशी जावे लागेल; बांगलदेशच्या कार्डिनल यांनी व्यक्त केली अपेक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅटिकन सिटी- जगातील सर्वात मोठी निर्वासितांची छावणी बनलेल्या बांगलादेशातून रोहिंग्या मुस्लिमांना मायदेशी परतावे लागेल. त्यासाठी ख्रिश्चन कॅथॉलिक समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस मदत करतील, असे आश्वासन बांगलादेशातील कार्डिनल पॅट्रिक डीरॉझारिआे यांनी दिले आहे.  

 

रोहिंग्या मुस्लिम म्यानमारमध्ये परततील, अशी मला आशा वाटते. आंतरराष्ट्रीय समुदायालादेखील रोहिंग्यांनी मायदेशी परतावे असे वाटते. पोप यांचा आगामी दौरा त्या दृष्टीने नक्कीच चांगले संकेत देणारा आहे. त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरू आहे. निर्वासितांना मायदेशी जाण्यासाठी आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन पोप करतील. खरे तर सध्या बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. सार्वजनिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे. निर्वासित बनलेल्या लाेकांना पहिल्यांदा आपण तुमच्या बाजूने उभे आहोत, हे सांगितले पाहिजे. ते हवालदिल झाले आहेत. त्यांना भावनिक आधार दिला गेला पाहिजे. सध्या ख्रिश्चन समुदायाच्या वतीने सुमारे ४० हजार कुटुंबीयांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जात आहे. निर्वासितांच्या छावण्यांत सुमारे ३ लाखांवर लोक राहतात.  

 

चार दिवसांचा दौरा  
पोप यांचा हा चार दिवसांचा बांगलादेश दौरा आहे. सोमवारी त्यांचे आगमन होईल. त्यानंतर गुरुवारी ते परततील. खरे तर त्यांच्या नियोजित वेळापत्रकात निर्वासितांच्या छावणीला भेट देण्याचा कार्यक्रम नाही. परंतु रोहिंग्यांच्या एका गटाने त्यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. रोहिंग्यांचे अश्रूू म्हणजे मानवतेचे अश्रू आहेत. हे अश्रू पुसणारे कोणीतरी असले पाहिजे, असे डीरॉझारिआे यांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...