आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्यानमारमधील साैंदर्यवतीने राेहिंग्या मुस्लिम संबंधित व्हिडिअाे केला अपलाेड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यांगून- राेहिंग्या मुस्लिमांशी संबंधित एक व्हिडिअाे अपलाेड करणे म्यानमारची साैंदर्यवती श्वे यान शीला चांगलेच महागात पडले. तिने एका साैंदर्य स्पर्धेत जाे मुकुट जिंकला हाेता, ताे परत घेण्यात अाला. कारण स्पर्धेच्या अायाेजकांना हा व्हिडिअाे याेग्य वाटला नाही. अायाेजकांनी सांगितले की, श्वेने हा व्हिडिअाे अपलाेड करून राेल माॅडेलसारखी वर्तणूक केली नाही. त्यामुळे तिच्याकडून मुकुट काढला.

म्यानमारची साैंदर्यवती श्वे हिने रखाईन भागात सुरू असलेल्या हिंसेशी निगडित व्हिडिअाे अाॅनलाइन पाेस्ट केला. या व्हिडिअाेत म्यानमारमध्ये पसरलेल्या अशांततेसाठी राेहिंग्या कट्टरवाद्यांना जबाबदार ठरवले हाेते. श्वेने या व्हिडिअाेत राेहिंग्या कट्टरवाद्यांवर जगाला चकवा देण्याचा अाराेप केला हाेता; जेणेकरून सर्व जग त्यांना पीडित समजेल. तिच्या या व्हिडिअाेत एअारएसए अराकान राेहिंग्या साॅल्व्हेशन अार्मीद्वारे पाेस्ट केलेल्या व्हिडिअाेचे ग्राफिकदेखील टाकण्यात अाले हाेते. हा व्हिडिअाे चर्चेत अाल्यानंतर साैंदर्य स्पर्धेच्या अायाेजकांनी रविवारी १९वर्षीय ‘मिस ग्रॅण्ड म्यानमार’चा मुकुट श्वेकडून परत घेतला. श्वे हिने नियमांचे उल्लंघन केले असून, एका राेल माॅडेलला साजेशी वर्तणूक केलेली नाही, असे अायाेजकांचे म्हणणे अाहे.

श्वेने स्वत: अापला मुकुट काढण्यात अाल्याची व त्यामागे व्हिडिअाे क्लिपचे कारण असल्याची माहिती मंगळवारी दिली. मात्र, अायाेजकांनी व्हिडिअाे अपलाेड केल्याने नव्हे, तर अटी-शर्तींचे पालन न केल्याने तिचा मुकुट काढण्यात अाला. या देशाच्या नागरिकाच्या रूपात अापली प्रसिद्धी पाहून तिने देशासाठी खरे बाेलायला हवे हाेते, असे स्पष्ट केले. 

म्यानमारमधील रखाईनमध्ये २५ अाॅगस्टला हिंसा भडकली, जेव्हा अराकान कटटरवाद्यांनी सुरक्षा चाैक्यांवर हल्ला केला. त्यानंतर सैन्य दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. तेव्हापासून सुमारे पाच लाख राेहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात पळ काढला आहे.

यापूर्वीही काढून घेण्यात अालेत साैंदर्य स्पर्धा विजेतींचे मुकुट
श्वे यान शी ही काही पहिलीच साैंदर्य स्पर्धा विजेती नाही की, जिचा मुकुट परत घेण्यात अाला. यापूर्वीदेखील काहींना अशा प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागला अाहे. सप्टेंबरमध्ये एका टि्वटचे कारण सांगून ‘मिस तुर्की-२०१७’च्या विजेतीकडून अायाेजकांनी मुकुट काढून घेतला हाेता. १८वर्षीय अायतिर एसेन हिने तुर्कीत मागील वर्षी झालेल्या सशस्त्र संघर्षाशी संबंधित एक पाेस्ट शेअर केली हाेती. त्यात तिने शहिदांवर टिप्पणी केली हाेती. त्यानंतर माेठा वाद निर्माण झाला हाेता. एसेनच्या टि्वटला बेजबाबदार मानून तिच्याकडून मुकुट परत घेण्यात अाला हाेता.
बातम्या आणखी आहेत...