आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Romanian Photographer Is In India To Capture Beauty Of Women

रोमानियाच्या फोटोग्राफरने टिपले भारतीय महिलांचे निखळ सौंदर्य, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांचे सौंदर्य टिपण्यासाठी जगाच्या भ्रमंतीवर निघालेले रोमानियाची फोटोग्राफर नुकतीच भारतात आली होती. मिहाइला नोरोक नावाची ही महिला जगभरात महिलांचे सौंदर्य टिपण्यासाठी निघाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जगातील विविध देशांत आणि त्याठिकाणच्या विविध भागांमध्ये जाऊन महिलांचे सौंदर्य कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचे काम ती करत आहे.

मिहाइलाने तिच्या या प्रोजेक्टला अॅटलास ऑफ ब्युटी म्हणजेच सौंदर्याचा नकाशा असे नाव दिले आहे. या कामासाठी मिहाइलाने तिची नोकरी सोडली आहे. आपल्या पृथ्वीवर असलेली विविधता महिलांच्या सौंदर्याच्या माध्यमातून दाखवणे हा तिच्या या प्रोजेक्टचा उद्देश आहे. महिला अंतरमनातून किती सुंदर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असल्याचे मिहाइला म्हणाली.
पुढील स्लाइड्सवर पाहू, मिहाइलाने काढलेले भारतातील आणि इतर देशांच्या महिलांचे काही PHOTOS