इंटरनॅशनल डेस्क - रोमेरियो डोस सेंटोसची कथा तुम्हाला हॉलिवूडच्या 'इनक्रेडिबल हल्क' चित्रपटाच्या सुपर हिरोची आठवण करुन देईल. रोमेरियोची ही 'तब्ब्यत' जिममध्ये वर्कआऊट केल्याने झालेली नाही, तर त्याने ऑइल आणि दारुचे इंजेक्शन लावून घेतले होते.
ब्राझीलमधील कालडास येथील रहिवासी असलेला रोमेरियो याने बॉडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शरीराशी खेळ केला आहे. 25 वर्षांच्या रोमेरियोला एक मुलगा आहे. आता त्याचे आक्राळविक्राळ बायसेप्स पाहून त्याचा मुलगाही घाबरतो. रोमेरियोने ऑइल आणि अल्कोहलच्या कॉकटेल पंपाद्वारे बायसेप्समध्ये इंजेक्शन घेतले. याला सिन्थॉल म्हटले जाते. त्यानंतर त्याचे शरीर आक्राळविक्राळ पद्धतीने वाढले. त्याचे बायसेप्स 25 इंचाचे आहेत. आता त्याचा मुलगाही त्याला घाबरतो. तो त्याला बीस्ट आणि मॉन्स्टर देखील म्हणतो. या अवाढव्य बायसेप्समुळे रोमेरियो वैतागला आहे. त्याने त्याचे दोन्ही हात कापण्याचाही प्रयत्न केला होता. त्याची पत्नी गर्भवती असताना त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.
रोमेरियोने सांगितले, की त्याला बॉडी बिल्डिंगचा छंद होता. जिममध्ये मजबूत मसल्स असलेल्या व्यक्तींसोबत मैत्री करुन त्यांच्या तंदरुस्तीची गुपीते तो जाणून घेत होता. एका मित्राने त्याला सिन्थॉल बद्दल सांगितले. याचे परिणाम लवकर जाणवतात हे ऐकल्यानंतर त्याला हा प्रयोग स्वतःवर करुन घेण्याची घाई झाली होती. त्याने पहिले आइल इंजेक्ट केले. त्याचा परिणाम त्याला लगेच जाणवला आणि त्याचे हात दगडासारखे झाले. ते एवढे टणक झाले की त्यात सिरिंज देखील जात नव्हती. मग त्याने एक स्पेशल इंजेक्शन वापरण्यास सुरुवात केली. असे इंजेक्शन साधरणपणे बैलांना दिले जातात. त्याच्या शरीरात झालेल्या बदलामुळे त्याची प्रकृती बिघडली, त्यामुळे पत्नीने घर सोडून जाण्याची धकमी दिली. यानंतर त्याने सिन्थॉल प्रक्रिया बंद केली. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रोमेरियोशी संबंधीत फोटो