योगाविषयी जगभरात लोकांच्या मनात जागृता आहे. योगा करण्यासाठी अनेक लोक प्राधान्य देतात.
आपल्या दिवसाची सुरुवात योगापासून करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून योगामध्ये अॅडव्हेंचर पोजिशन दिसून येत आहेत.
वरील छायाचित्रातील योगा करणारे हे कपल सिडनीचे रहिवासी आहेत. दोघांची नावे होंजा आणि क्लॉडिन लेफोंड असून त्यांनी इंस्टाग्रामवर अशा योगा पोजिशनची छायाचित्रे शेअर केली आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे 2.5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
सिडनीचे रहिवासी होंजा आणि क्लॉडिन 'योगा बियोंड' नावाची योग संस्था चालवतात. त्यामध्या जगभरातून अनेक लोक योगा, एक्रोविन्यास (योगाचा एक प्रकार) आणि एक्रोबेटीक फ्लाइंगचे प्रशिक्षण देतात. होंजाचा जन्म चेक रिपब्लिक, तसेच क्लॉडिनचा न्यूयॉर्कमध्ये झाला. या कपलने 2008मध्ये लग्न आणि तेव्हापासून आतापर्यंत योगाचे ट्रेनिंग देत आहेत. दोघे योगाच्या प्रशिक्षणासाठी जगभरात प्रवास करतात. जगभरात अनेक प्रसिध्द ठिकाणांवर या कपलने एक्रोविन्यास आणि एक्रोबेटीक फ्लाइंगच्या पोजिशन दाखवल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा होंजा आणि क्लॉडिनच्या योगाचा अजब स्टाइलची काही छायाचित्रे...