आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार चालवण्यास मनाई; तेथे यशस्वी लँडिंग!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या देशात महिलांना कार चालवण्याचेही स्वातंत्र्य नाही त्या देशात म्हणजेच सौदी अरबमध्ये तितक्याच आत्मविश्वासाने विमानाचे लँडिंग करणाऱ्या या तीन वैमानिक. रॉयल ब्रुनेई एअरलाइन्समधील या तीन वैमानिकांना बोइंग ७८७ ड्रीमलायनर या विमानाच्या ‘ब्रुनेई ते जेद्दाह’ दरम्यान फेऱ्या करण्यास सांगण्यात आल्या तेव्हादेखील सौदीत आपण थेट विमानाचे लँडिंग कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला नाही.
{ या चमूतील कॅप्टन जरिना म्हणतात,वैमानिकांसमोर खूप आव्हाने असतात, त्यातही सौदी अरबसारख्या देशात टास्क मिळाल्यास आव्हाने दुपटीने वाढतात. मीसुद्धा वैमानिक होण्याचे ठरवले तेव्हा विरोध झाला होता. पण मी जिद्दीने इंग्लंडमधील कॅबएअर फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. आज आमच्या कामामुळेच रॉयल ब्रुनेई एअरलाइन्सने जास्तीत जास्त महिलांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
}independent.co.uk
बातम्या आणखी आहेत...