आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupert Murdoch Announce Engagement With Jerry Hall

84 वर्षीय माध्‍यम सम्राट रूपर्ट मरडॉक करणार चौथे लग्‍न, सुपरमॉडेलसोबत संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - माध्यम सम्राट रूपर्ट मरडॉक 59 वर्षीय सुपरमॉडेल जेरी हॉल यांच्‍यासोबत लग्‍न करणार आहेत. मरडॉक यांनी न्यूज कॉर्पोरेशन कंपनीच्‍या टाइम्स न्यूजपेपरमध्‍ये बर्थ, मॅरेज आणि डेथ सेक्शनमध्‍ये ही घोषणा केली. मागील आठवड्यात या दोघांचा लॉस आंजल्समध्‍ये साखरपुडा झाल्‍याची माहितीही समोर आली आहे.
जेरीचे जॅगरसोबत होते संबंध....
- मिस जेरीने आजपर्यंत लग्‍न केले नाही. पण गायक सर मिक जॅगरसोबत तिचे अधिकाधिक काळापासून संबंध राहिले.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार जेरी जॅगरसोबत 1977 पासून ते 1999 पर्यंत राहिली आहे. या दोघांना चार मुलेही आहेत.
- जेरी आणि मरडॉक यांच्‍यातील नवीन नात्‍याची सुरूवात यंदाच्‍या उन्‍हाळ्यात झाली.
- एका प्रवक्त्याच्‍या माहितीनुसार, ''दोघे काही महिन्‍यांपासून एकमेकांसोबत राहतात.''
- ''या दोघांना लग्‍नानंतरच्‍या भविष्‍याबद्दल उत्‍सुकता आहे. दोघेही लग्‍न होणार असल्‍याने खुश आहेत.''
कसे उघड झाले दोघांमधील संबंध?
- जेरी आणि रूपर्ट यांच्‍यातील संबंध ऑक्‍टोबर महिन्‍यातच समोर आले होते.
- तेव्‍हा ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्‍यानचा रग्बी विश्वचषकाचा अंतिम सामना पाहायला गेले होते.
- द टाइम्सच्‍या माहितीनुसार, दोघांची भेट ऑस्‍ट्रेलियामध्‍ये रूपर्ट यांच्‍या बहिणीनेच करून दिली होती.
कोण आहे रूपर्ट मरडॉक ?
- 1931 मध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये जन्‍मलेले रूपर्ट सध्‍या अमेरिकेचे नागरिक आहेत.
- ते सध्‍या 85 हजार कोटी रूपयांच्‍या संपत्‍तीचे मालक आहेत.
- 2013 मध्‍ये वेंडी डेंगसोबत त्‍यांचे तिसरे लग्‍न तुटले होते.
- 1952 मध्‍ये ते ऑस्ट्रेलिया न्यूज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बनले.
- मरडॉक हे ग्लोबल मीडिया कंपनी न्यूज कॉर्पोरेशनचे संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ आहेत. ही कंपनी जगातील सर्वात मोठी दुसरी कंपनी आहे.
- 1950 आणि 60 च्‍या दशकात त्‍यांनी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्‍या कित्‍येक वृत्‍तपत्र कंपन्‍यांची खरेदी केली.
- 1969 मध्‍ये त्‍यांनी यूकेमध्‍ये बिझनेस पसरवला.
- 2000 पर्यंत 50 देशांमध्‍ये ते 800 कंपन्‍यांचे मालक बनले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, रूपर्ट आणि जेरी यांचे काही खास फोटो...