आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाचा शत्रू अतिरेकी बगदादीचा खात्मा, हवाई हल्ल्यात ठार; रशियाचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- ISIS या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबु बकर अल बगदादी याला ठार केल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाच्या लष्कराने 28 मे रोजी सीरियातील रक्का या शहरावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात बगदादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.  बगदादी सोबत असणारे ISIS चे अनेक मोठे नेतेही ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही 4 वेळा बगदादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता. याची कधीच पुष्टी होऊ शकली नाही. भारतातही ISIS शी निगडित काही लोकांना पकडण्यात आले आहे. हैदराबादमध्ये 12 जणांना यासंदर्भात पकडण्यात आले होते. 

काय आहे प्रकरण 

- रशियाच्या लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही 28 मे रोजी सीरियातील रक्का या शहरावर हल्ला केला. या हल्ल्यात ISIS चा टॉप कमांडर अब बकर अल बगदादी मारला गेला. या संदर्भातील निवेदनात ISIS चे आणखी काही नेते मारले गेल्याचेही म्हटले आहे. 
 
यापूर्वी 4 वेळा आली होती बगदादी ठार झाल्याची बातमी

1. मार्च 2015

- 18 मार्च 2015 रोजी अमेरिकेच्या लष्कराने दावा केला की सीरियातील अल बाज या शहरातील निन्वेह या भागात बगदादीला ठार मारण्यात आले आहे. सांगण्यात आले की त्यावेळी बगदादी आपल्या टॉप कमांडर्स सोबत मीटिंग करत होता. बगदादी ठार झाल्याने संघटना नव्या नेत्याचा शोध घेत असल्याचेही सांगण्यात आले पण माहिती खोटी निघाली.
- याच दरम्यान एक बातमी अशीही आली की बगदादी या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्या पाठीचे हाड तुटले आहे. त्याच्यावर इराकचे दोन डॉक्टर मोसुल शहरात उपचार करत असल्याचेही सांगण्यात येत होते.

2. ऑक्टोबर 2015

- यावेळी इराकी सेनेच्या वतीने बगदादीला ठार मारण्याचा दावा करण्यात आला. एका निवेदनात इराकी सेनेने म्हटले की, कर्बला येथे जाताना बगदादीच्या तुकडीवर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बगदादी ठार झाला. हा दावाही खोटा असल्याचे नंतर समोर आले. 

3. जून 2016

- तुर्की समवेत अन्य काही देशातील माध्यमांनी दावा केला की, बगदादी एका हवाई हल्ल्यात ठार झाला. याबाबत कोणतेही पुरावे देण्यात आले नाहीत. ही माहिती नंतर खोटी असल्याचे स्पष्ट झाले.

4. जून 2017

- 14 जूनला दावा करण्यात आला की रमजान महिन्यातील पाचव्या दिवशी हवाई हल्ल्यात बगदादीचा मृत्यू झाला. इराणच्या मीडियानेही असाच दावा केला. लष्कराने मात्र या वृत्ताला दुजोरा दिला नाही.  
बातम्या आणखी आहेत...