आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russia Accepts That The Plain In Sinai Was Crashed Due To Bomb

रशियाचे 'ते' विमान दहशतवाद्यांनीच पाडले, बॉम्बने उडवल्याची माहिती उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियन एअरलाइन्सचे एअरबस ए-321 हे विमान दहशतवाद्यांनीच पाडले होते, या वृत्ताला रशियाने दुजोरा दिला आहे. रशियाचे संरक्षणप्रमुख अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना एका बैठकीमध्ये याबाबत माहिती दिली.

इजिप्तच्या सिनई भागामध्ये 31 ऑक्टोबर रोजी हे विमान कोसळले होते. त्यामध्ये विमानातील सर्व 224 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ISIS ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र संरक्षण अधिकाऱ्यांनी त्‍यांचा दावा फेटाळून लावला होता. मात्र आता हे विमान दहशतवाद्यांनी पाडले होते याला रशियानेच दुजोरा दिला आहे. एका बॉम्बच्या सहाय्याने हे विमान हवेतच उडवून देण्यात आले होते, असा दावा त्यांनी तज्ज्ञांचा हवाला देत केला आहे.
अमेरिकेने केला होता दावा
दरम्यान या अपघातग्रस्‍त विमानामध्‍येच बॉम्‍ब ठेवला होता आणि तो फुटल्‍याने ही दुर्घटना झाली, असा दावा अमेरिकेच्या गुप्‍तचर संस्‍थेच्‍या हवाल्याने अमेरिकेतील सीएनएन वृत्‍तवाहिनीने केला होता. तसेच हे कृत्‍य ISIS नेच केलेले असावे, अशी शंकाही व्‍यक्‍त करण्यात आली होती.