आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्येही पुतीन यांना हवा मर्जीचा राष्ट्रपती, ली पेन यांना जिंकवण्यासाठी करू शकतात हॅकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - अमेरिकी निवडणुकीत हॅकिंग करून डोनाल्ड ट्रम्प यांची मदत करणाऱ्या रशियाची नजर आता युरोपच्या तीन देशांतील निवडणुकांवर आहे. यात फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड्स समाविष्ट आहे. फ्रान्सची सुरक्षा संस्था (डीजीएसई) २३ एप्रिलला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसंबंधी खूपच सावध आहे.
 
त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी दक्षिणपंथी उमेदवार मरिनो ली पेनला मदत करण्यासाठी रशियाविरोधी उमेदवारांचे ई मेल-वेबसाइट हॅक करू शकते. मतमोजणीवरही परिणाम होऊ शकतो. याच कारणामुळे मॅन्युअली मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.   

डीजीएसईनुसार रशिया, अमेरिकेप्रमाणे फ्रान्समध्येही हॅकिंग करण्यापासून ते सोशल मीडियावर अफवा पसरवत आहे. रशियाची इच्छा आहे की, रशिया समर्थक मॅरिन ली पेन फ्रान्सची पुढील राष्ट्रपती व्हावी. मानले जात आहे की, रशियन संस्था त्यांच्या समर्थनात पुढील दोन महिन्यांत सोशल साइट्सवर लाखो पोस्ट करणार आहेत आणि त्यास व्हायरलही करणार आहेत. ली पेन यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे गोपनीय ई-मेलही हॅक केले जातील. तथापि, रशियाची इच्छा आहे की ली पेन जिंकाव्यात. त्यांच्या राष्ट्रपती होण्यावर ब्रिटनप्रमाणे फ्रान्सही युरोपीय युनियन (ईयू)मधून बाहेर पडू शकतो. यात ईयू कमजोर होईल. यामुळे युरोपात रशियाचा हस्तक्षेप वाढेल. तथापि, कमजोर ईयू, अमेरिकेसाठी अधिक उपयोगी राहणार नाही. 

पहिल्या टप्प्यात बहुमताची शक्यता कमीच
फ्रान्समध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी आहे. एकूण १० उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. पण मुख्य स्पर्धा चार उमेदवार ली पेन, फ्रान्स्वा फियों, बेनॉय हॅमन, इमानुल मॅक्रों यांच्यात आहे. फेब्रुवारीत झालेल्या जनमत चाचणीत ली पेन जवळपास २५ टक्के मते घेऊन सर्वात पुढे जात आहेत. फियों, बेनॉय आणि मॅक्रों तिघांना १५ ते २० टक्के मते मिळतील. जनमतानुसार पहिल्या टप्प्यात कुणालाही बहुमत (५० टक्के ) मिळालेले नाही. सात मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील तीन उमेदवार फियों, ली पेन आणि मॅक्रोंमधून दोघांमध्ये सामना होऊ शकतो.  
 
रशियन मीडियानुसार मॅक्रो अमेरिकी एजंट आणि गे लव्हर  
रशियन माध्यमांमध्ये फ्रान्समधील उमेदवारांच्या संबंधात अनेक बातम्या देताहेत. अशीच एका बातमी एन मार्क पार्टीचे उमेदवार इमानुल मॅंक्रोंना अमेरिकी एजंट आणि गे लव्हर दर्शवले आहे. मॅक्रों २०१४ ते २०१६ च्या दरम्यान वित्त आणि डिजिटल प्रकरणांचे मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी नवा पक्ष बनवला आहे.  
 
फियोंवर पत्नी आणि मुलांवर सरकारी पैसे खर्चाचा आरोप  
रिपब्लिकन उमेदवार फ्रान्स्वा फियों यांच्याबाबत विकिलीक्सने दावा केला आहे की, त्यांनी पत्नी आणि मुलांवर लाखो युरोची सरकारी रक्कम खर्च केली. त्यांना सरकारी पैशांवर विदेशात पाठवले. याची चौकशी सुरू झाली आहे. प्रारंभी या दाव्यांना आरोप दर्शवणाऱ्या फियोंनी नंतर माफी मागितली.
 
ओलांद ५९ वर्षांत पहिले असे राष्ट्रपती जे पुन्हा उमेदवार नाही  
राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद दुसऱ्यांदा निवडणूक लढवत नाहीयेत. त्यांनी जानेवारीत याची घोषणा केली. ते १९५८ च्या नंतर असे पहिले राष्ट्रपती आहेत, जे दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाहीत. ओलांद यांनी हा निर्णय घटत्या लोकप्रियतेच्या कारणामुळे घेतला आहे. ते गेल्या ४० वर्षांतील सर्वात कमी लोकप्रिय राष्ट्रपती आहेत.  
 
मुस्लिमविरोधी प्रतिमा ली यांची  
नॅशनल फ्रंटचे उमेदवार ली पेन यांची प्रतिमा स्थलांतरितांच्या विरोधातील, मुस्लिमविरोधी अशी बनवली गेली आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात आपला जाहीरनामा सादर केला. यात म्हटले आहे की, ते फ्रान्सला कडव्या इस्लामपासून सुटका देववतील. जागतिकीकरणाच्या नुकसानीमुळे देशाला त्या वाचवतील. कुणाच्याही आधी आपल्या नागरिकांना संधीत प्राधान्य देतील. ईयूमधून निघण्यासाठी जनमत संग्रह चाचणी केली जाईल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...