आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISचा खात्मा करण्यास क्षेपणास्त्रेच पुरेशी, अणुबॉम्बची गरजच नाही- पुतीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- रशियाने बुधवारी सीरियामधील दहशतवादी संघटना ISIS च्या तळांवर क्षेपणस्त्र हल्ला केला आहे. रशियाने बुधवारी प्रथमच 2400 किलोमीटर अंतरावरून कॅस्पियन महासागरात तैनात असलेल्या पाणबुडीवरून हे क्षेपणास्त्र डागले आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने कॅस्पियन महासागरात पाणबुडी आणि मिसाइल क्रूझर पाठवल्याची माहिती संरक्षणमंत्री सर्गेइ शोइगू यांनी दिली आहे.

ISISचा खात्मा करण्यासाठी रशियाची क्षेपणास्त्रच पुरेशी आहेत. त्यासाठी अण्वस्त्र हल्ल्याची (अणुबॉम्ब) गरज भासणार नसल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हल्ल्यानंतर म्हटले आहे. पुतीन यांनी एकप्रकारे ISISला जणू अण्वस्त्र हल्ल्याचे संकेतच दिले आहेत.

युद्धभूमीवर होणार्‍या सर्व बाबींचे विश्लेषण करणे गरजेचे असते. देशाकडे कोणते शस्त्र आहेत व ते कसे ऑपरेट केले जातात, हे देखील शस्त्रूला दाखवून द्यावे लागत असते. मात्र, आम्हाला आशा आहे की, ISIS च्या तळांवर अण्वस्त्र हल्ला करण्याची गरज भासणार नसल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सीरियामधील ISIS या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हलल्यांचे प्रमाण वाढवले आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेइ शोइगू यांनी स्वतः त्याबाबत माहिती दिली आहे. रशियाने प्रथमच 2400 Km अंतरावरून कॅस्पियन महासागरात तैनात असलेल्या पाणबुडीवरून हे क्षेपणास्त्र दागले आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने कॅस्पियन महासागरात पाणबुडी आणि मिसाइल क्रूझर पाठवले होते.

रशियाच्या मंत्र्यांनी दिली माहिती..
- शोइगू म्हणाले की, क्षेपणास्त्र सिरियाच्या रक्का शहरातील IS च्या दोन तळांना लक्ष्य करून सोडण्यात आले.
- कॅलिबर मिसाइल पारोस्तोवॉन डॉन या पाणबुडीतून सोडण्यात आले.
- ते म्हणाले की, हल्ल्यांमध्य IS चे अनेक तळ आणि शस्त्रांसह तेलाचे टँकर उध्वस्त झाले आहेत.
- पाणबुडीवलून श्रेपणास्त्र हल्ला करण्याबाबत रशियाने आधीच इस्रायल आणि अमेरिकेला माहिती दिली होती.
- ते म्हणाले की, रशियाच्या एअरफोर्सने तीन दिसांपूर्वीच सिरियामध्ये 300 हवाई हल्ले केले होते.

रशियाने मिसाइल क्रूझर पाठवण्याचे कारण
- ISIS च्या तळांवर हल्ल्याशिवाय रशियाने तुर्कस्तानचा निपटारा करण्यासाठी क्रूझर मिसाइल पाठवल्या आहेत.
- तुर्कस्तानने रशियन एअरफोर्सचे जेट पाडले होते. आता या परिसरात मिसाइल क्रूझर तैनात केल्याने तुर्कस्तान रशियन एयरफोर्सच्या विरोधात कारवाई करू शकणार नाही.
- जर तुर्कस्तानने रशियन एअरफोर्सला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर रशियाचे क्रूझर फाइटर प्लेनला कव्हर देण्यासाठी सज्ज होईल.
- सिरियामद्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या विरोधात चालवल्या जास असलेल्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले जेट्सलाही या क्रूझरचे सेक्युरिटी कव्हर मिळेल.

रशियन मिसाइल क्रूझरची शक्ती
> लांबी 186.4 मीटर आणि रूंदी 20.8 मीटर आहे. त्यात 476-529 क्रू मेंबर्सच्या प्रवासाची क्षमता आहे.
> क्रूझरमध्ये चार M8KF गॅस टर्बाइन्स 120,000 हॉर्स पॉवर ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळ 32 नॉट्स पर्यंतचा वेग मिळतो.
> यात तीन प्रकारच्या मिसाइल सिस्टीम आहेत.
> पहिली 16 P-500 Bazalt अँटी शिप मिसाइल.
> दुसरी 64 S-300PMU लाँग रेंज सर्फेस टू एअर अटॅक करणारे मिसाइल.
> तिसरी OSA-M सर्फेस टू एअर अटॅक करणारी मिसाइल सिस्टीम.
> क्रूझरवर 130mm ची गन आहे ती मिनिटाला 40 राऊंड फायर क्षमतेची आहे.
> त्याशिवाय AK-630 वेपन्स सिस्टीमही आहे. ते 6 बॅरल असलेल्या 30mm ऑटोमॅटिक गनला कंट्रोल करतात.
> त्यात एका मिनिटांत 5,000 राऊंड फायरची क्षमता आहे.
> अँटी सबमरीन सिस्टीममध्ये दोन RBU 6000 रॉकेट लॉन्चरही आहेत. ते 6 किलोमीटरच्या रेंजमध्ये सबमरीनला लक्ष्य करू शकतात.

पुढील स्लाइडवर पाहा, रशियाने सीरियावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा फोटो...