आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाने सीरियावर टाकले 'फॉदर ऑफ ऑल बॉम्ब', 40 दहशतवाद्यांचा खात्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात झालेल्या या हल्ल्यास फेसबूकवर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला पण संरक्षण मंत्र्यांनी अद्याप यावर भाष्य केले नाही. - Divya Marathi
गेल्या आठवड्यात झालेल्या या हल्ल्यास फेसबूकवर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला पण संरक्षण मंत्र्यांनी अद्याप यावर भाष्य केले नाही.
दमास्कस - रशियाने सीरियातील देइर अज-जोर शहरावर 'फॉदर ऑफ ऑल बॉम्ब्स' नामक शक्तीशाली बॉम्ब टाकल्याचे मंगळवारी जाहीर केले आहे. हे बॉम्ब आतापर्यंतचे सर्वात घातक एविएशन थर्मोफॅब्रिक बम ऑफ इंक्रीजिंग पावर म्हणूनही ओळखले जाते. 7 सप्टेंबर रोजी ट्विटरवर एक पोस्ट करून एका सामाजिक कार्यकर्त्याने सुद्धा या बॉम्ब हल्ल्याचा दावा केला होता. त्यालाच रशियाने मंगळवारी फेसबूकवर पोस्ट केले. 
 

IS चे 40 दहशतवादी ठार
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेसबूकवर जाहीर केलेल्या माहितीनुसार, सीरियात आयएसच्या कमांडरसह त्याच्या सहकाऱ्यांना लक्ष्य करून हा बॉम्ब टाकण्यात आला. यात दहशतवाद्यांच्या कमांडरसह 40 दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये अमेरिकेत प्रशिक्षित झालेला गुलमुरोड खलिमोव्ह आणि अबु मुहम्मद अल शिमाली सुद्धा ठार मारल्या गेला. खलिमोव्हच्या डोक्यावर 198 कोटींचे बक्षीस होते. 
 

मदर ऑफ ऑल बॉम्बपेक्षा 4 पट घातक
रशियाने फॉदर ऑफ ऑल बॉम्बची चाचणी सर्वप्रथम 11 सप्टेंबर 2007 रोजी केली होती. अणुबॉम्बनंतर हे बॉम्ब सर्वात शक्तीशाली मानले जाते. अमेरिकेने नुकतेच अफगाणिस्तानवर टाकलेल्या मदर ऑफ ऑल बॉम्ब्सपेक्षा ते 4 पटीने अधिक घातक आहे. या बॉम्ब हल्ल्यानंतर होणाऱ्या नुकसानीची तुलना अणुबॉम्ब हल्ल्याशी सुद्धा केली जाते. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...