आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russia Established A War Room To Keep Eye On Syria & Military Exercise

ही आहे रशियाची सिक्रेट वॉररुम, पुतीन येथून ठेवतात लष्करी घडामोडींवर नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या हॉलिवूड स्टाईल वॉर रुमचे हे फोटो आहेत. सीरियासह जगभरात सुरु असलेल्या मिलिटरी कॅम्पेनवर ते येथूनच लक्ष ठेवतात. राजधानी मॉस्कोच्या मध्यभागी असलेल्या मॉस्कवा नदीजवळ हे नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटर आहे. तीन मजली या इमारतीत रशियन अॅनॅलिस्ट वॉर झोनच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. त्याची माहिती समोरच्या भींतीवर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर दाखवली जाते.
अमेरिकेच्या पेन्टॅगॉन एवढे आहे हे सेंटर
या सेंटरच्या पहिल्या मजल्यावर मध्यभागी असलेल्या खुर्चीवर बसून ब्लादिमीर पुतीन मिलिटरी घडामोडींवर लक्ष ठेवतात. न्युक्लिअर मिसाईल लॉंचिंगही असले तरी पुतीन येथे उपस्थित असतात. सीरियात सुरु असलेल्या लष्करी कारवाईशी संबंधित मिलिटरी अॅडव्हाझर्स पुतीन यांच्या शेजारी बसले असतात. हे ऑपरेशन बेस आकाराने पेन्टॅगॉन एवढे आहे. या इमारतीचे बांधकाम गेल्या वर्षी पूर्ण झाले. रशियन मिलिटरीच्या आधुनिकीकरणासाठी आखण्यात आलेल्या 10 वर्षांच्या योजनेचा हा एक भाग आहे.
सीरियात रशियाचे मिलिटरी कॅम्पेन
सप्टेबर महिन्यापासून रशियाने सीरियात हवाई हल्ले सुरु केले आहेत. इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांविरुद्ध हे अभियान असल्याचा दावा रशिया करीत आहे. पण पश्चिमेकडील देशांनी आरोप केला आहे, की रशिया बंडखोर आणि नागरिकांना टार्गेट करीत आहे. सीरियाचे अध्यक्ष असद यांच्याविरुद्ध हे नागरिक लढत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, रशियाच्या सिक्रेट वॉर रुमचे फोटो....