आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russia Sending Messages To Islamic State Jihadists Written On Bombs

ISIS ला रशियाचे दोन मॅसेज, बॉम्बवर लिहिले, 'आमच्या लोकांसाठी - पॅरिससाठी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशिया सिरियात ISIS च्या तळांवर एकापाठोपाठ एक हल्ले करत आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे एक विमान दहशतवाद्यांनी सिनाईमध्ये पाडले होते. त्यात 224 जण मारले गेले होते. त्यानंतर पॅरिसमध्ये हल्ला झाला. त्यात 129 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे रशियाचे फायटर जेट्स आता सिरियामध्ये जे बॉम्बहल्ले करत आहेत, त्या बॉम्बवर दोन संदेश लिहिलेले असतात. रशियाचे विमान पाडण्याच्या घटनेसाठी आमच्या लोकांसाठी आणि पॅरिस हल्ल्याच बदला घेण्यासाठी पॅरिससाठी अशा आशयाचे संदेश लिहित आहेत.

संरक्षण मंत्रालयाने जारी केले PHOTOS
रशियाचे हे फायटर जेट्स सिरियामध्ये त्यांच्या एअरबेसवर जातात. त्यानंतर ते ISIS च्या तळांना उध्वस्त करतात. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने फायटर जेट्सवर लावलेल्या बॉम्बचे फोटो ट्विटरवर जारी केले आहेत. त्यात म्हटले आहे की, आम्ही दहशतवाद्यांना एअरमेलद्वारे संदेश देत आहोत. एवढेत नाही तर, इंटरनेटवर काही फोटोदेखिल व्हायरल झाले आहेत. त्यात फ्रेंच जेट फायटर्सच्या सिरियामध्ये जाऊन पडलेल्या मिसाईलही दाखवण्यात आल्या आहेत. त्यावर लिहिले आहे फ्रॉम पॅरिस विथ लव्ह.

रशिया आणि फ्रान्स आतापर्यंत सोबत
रशिया आणि फ्रान्समध्ये साधारणपणे फार जवळीक नाही. पण या दो घटनांमुळे या देशांमधली जवळीकता वाढली आहे. दोन्ही घटनांसाठी ISIS लाच जबाबदार ठरवले जात आहे. रशियाचे विमानही ISIS ने पाडले होते. तसेच पॅरिस हल्ल्याच्या मागेही ISIS चा हात होता. त्यामुळे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्सचया अधिकाऱ्यांबरोबर काम करत असल्याचे स्पष्ट केले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सुआ ओलांद पुढील महिन्यात क्रेमलिन यांना भेटणार आहेत. रशिया 30 सप्टेंबरपासून सिरियामध्ये ISIS च्या तळांवर हल्ले करत आहे.