आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासायनिक हल्ल्यानंतर असद सरकारविरोधी ठरावावर रशियाचा व्हेटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे- सिरियात गेल्या आठवड्यात वापरण्यात आलेल्या रासायनिक शस्त्रांच्या वापराच्या विरोधातील सुरक्षा परिषदेतील ठरावावर रशियाने आपला विशेषाधिकाराचा वापर केला. बुधवारी ठरावावर झालेल्या मतदान प्रक्रियेत १५ सदस्यीय परिषदेत १० देशांनी ठरावाच्या बाजूने कौल दिला. 
 
फ्रान्सने हा ठराव मांडला. त्यात रासायनिक शस्त्रे वापरण्याच्या कृतीचा निषेध करून असद सरकारच्या विरोधातील मसुदा सभेच्या पटलावर सादर करण्यात आला होता. त्याचे दहा सदस्य राष्ट्रांनी समर्थन केले. त्यात अमेरिका, ब्रिटनचाही समावेश आहे. स्थायी सदस्य असलेल्या रशियाने हा मसुदाच नाकारला. चीननेदेखील मसुद्यावर नापसंती दर्शवली. अस्थायी सदस्य असलेले इथिओपिया व कझाकिस्तान यांचे प्रतिनिधी बैठकीस अनुपस्थित होते.  मसुद्यातून कोणत्याही प्रकारचे उत्तरदायित्व दिसून येत नाही. संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र तपासालादेखील आमचे सहकार्य नसेल, असा पवित्रा रशियाने घेतल्याने हा ठराव सर्वानुमते मंजूर होऊ शकला नाही, असे अमेरिकेच्या राजदूत निकी हेली यांनी स्पष्ट केले. 

तपासाच्या अगोदरच  दोषी निश्चित कसा?
सिरियातील रासायनिक हल्ल्याचा निषेध करणारा ठराव सुरक्षा परिषदेत मांडला जातो, याला आमचा विरोध नाही. परंतु घटनेचा योग्य तपास न करताच दोषी निश्चित मानून हा ठराव सादर केला जात आहे. ही बाब आमच्या दृष्टीने चिंतेची, आक्षेपार्ह आहे. तसा दोषी निश्चित कसा ठरवता येऊ शकेल? असा प्रश्न रशियाचे राजदूत ब्लादिमीर साफ्रोंकोव्ह यांनी उपस्थित केला होता.  

खान शायखून चर्चेत...
गेल्या आठवड्यात सिरियातील खान शायखून ही जागा जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. कारण सिरियन फौजांनी याच भागात रासायनिक शस्त्रांचा वापर केला होता. त्यावर जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली होती. 

सहा वर्षांत आठव्यांदा विरोधी पवित्रा...
सिरियातील असद सरकारच्या विरोधात आलेल्या ठरावावर विशेषाधिकाराचा वापर करण्याची रशियाची ही आठवी वेळ आहे. सिरियात गेल्या सहा वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे. असद सरकारने मानवी हक्कांची पायमल्ली केली आहे. त्याच्या विरोधात ठराव मंजूर करण्याचे प्रयत्न झाले. परंतु दरवेळी रशियाने खोडा घालून सुरक्षा परिषदेच्या विरोधात जाहीर पवित्रा घेतला आहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...