आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियन हवाई दलाचा सिरियातील देईर इझ्झाेर भागात हल्ला; 21 मुलांसह 53 नागरिक ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैरूत- रशियन हवाई दलाने सिरियातील देईर इझ्झाेर भागात केलेल्या हल्ल्यात २१ मुलांसह ५३ नागरिक ठार झाले. पूर्व सिरियातील एका गावावर इस्लामिक स्टेटने कब्जा मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर रशियन हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात रहिवासी इमारतींना लक्ष्य केले. ही कारवाई साेमवारी सकाळी करण्यात अाली. युफ्रेटस नदीकाठावरील देईर इझ्झाेर प्रांतातील अल-शाफाह गावाला या हल्ल्याचा फटका बसला.  


याबाबत सिरियन मानवाधिकार संस्थेने दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणाऱ्या विमानांनी प्रथम सर्व भागाची पाहणी केली. तसेच त्यानंतर युद्धसामग्री अाणि लढाऊ विमाने अाणून हा हल्ला केला. त्यात संस्थेतर्फे ३४ जण ठार झाल्याची माहिती देण्यात अाली; परंतु मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे व सुमारे १८ नागरिक जखमी झाले अधिकृत सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रशिया हा सिरियाचा जवळचा मित्र असून, रशियातर्फे सप्टेंबर २०१५मध्ये सिरियन सरकारच्या मदतीसाठी दमास्कस भागात माेठ्या लष्करी माेहीम राबवण्यात अाली हाेती. देईर इझ्झाेर हा सिरियातील इस्लामिक स्टेटच्या जिहादींचा गड अाहे. इराकने तेलसंपन्न असलेल्या येथील पूर्वेकडील प्रांत दहशतवादमुक्त केला हाेता; परंतु जिहादींनी देईर इझ्झाेरच्या नऊ टक्के भागावर पुन्हा कब्जा मिळवल्याचे मानवाधिकार संस्थेने सांगितले.  या कारवाईमुळे तेथिल दहशतवादी कारवायांचे प्रमाण कमी झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...