आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रुग्‍णाने केला NURSE ला स्‍पर्श, डॉक्टरने केले एका बुक्‍कीत ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हिडिओ पाहण्‍यासाठी वर क्लिक करा - Divya Marathi
व्‍हिडिओ पाहण्‍यासाठी वर क्लिक करा
मॉस्को (रशिया) - रशियातील बेलगोरॉड शहरातील एका रुग्‍णालयात रुग्‍णाने कामुक भावनेने नर्सला स्‍पर्श केला. त्‍यामुळे खवळलेल्‍या डॉक्‍टरने त्‍याच्‍या डोक्‍यात जोरदार बुक्‍की मारली. यात रुग्‍णाचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना 29 डिसेंबरची आहे. मात्र, सीसीटीव्‍ही फुटेजमुळे हा प्रकार आता उघडकीस आला.
नेमके काय झाले?
- ही घटना राजधानी मॉस्कोपासून 670 किमी अंतरावर असलेल्‍या बेलगोरॉड शहरात घडली.
- रशियन माध्‍यमांनुसार, येवजेनी बख्तिन (वय 56) या रुग्‍णाने नर्सला कामूक भावनेने स्‍पर्श केला. ही बाब इल्या जेलेनडिनोव नावाच्‍या डॉक्‍टरला खटकली.
- डॉक्टरने त्‍याला विचारले, ''नर्सला का स्‍पर्श केला ?'' नंतर त्‍याच्‍या डोक्‍यात जोदरार बुक्‍की मारली.

काय आहे सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये ?
- एका अर्धनग्‍न रुग्‍णाची तपासणी करताना एक नर्स दिसत आहे.
- नंतर निळे टी शर्ट घातलेला एक डॉक्‍टर येतो. रुग्‍णाला ओढून धक्‍के मारतो.
- दरम्‍यान, काळ्या जॅकेटमध्‍ये असलेली एक व्‍यक्‍ती तिथे येते. तिच्‍यावर डॉक्टर हल्‍ला करतो.
- या झटापटीत डॉक्‍टर रुग्‍णाच्‍या डोक्‍यात जोरदार बुक्‍की मारतो. त्‍यामुळे घटनास्‍थळीच त्‍याचा मृत्‍यू होतो.
डॉक्टरला होऊ शकते दोन वर्षांची शिक्षा
- सीसीटीव्‍ही फुटेज समोर आल्‍यानंतर रशियाच्‍या माध्‍यमात या बातमीची चांगलीच चर्चा आहे.
- या प्रकरणी पोलिस अधिकारी येलेना कोजीरेवा यांनी सांगितले की, डॉक्‍टरविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
- त्‍याच्‍या विरुद्ध गुन्‍हा सिद्ध झाल्‍यास त्‍याला दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो...