आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियन अग्निशमन दलाचे विमान सैबेरियात गायब, सुरक्षा यंत्रणा चिंतित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- रशियाचे आणीबाणीच्या परिस्थितीत मदतकार्य करणारे विमान शुक्रवारी गायब झाल्याने सुरक्षा यंत्रणा चिंतित पडली आहे. सैबेरियात ही घटना घडली असून विमानात १० कर्मचारी होते. ते बेपत्ता आहेत.

सैबेरियातील वणवा विझविण्याच्या मोहिमेत रशियाची पथक सहभागी झाले होते. इरकुत्सक प्रांतातील जंगलाला आग लागली आहे. हा वणवा विझविण्याच्या कामात रशियाने आपले अग्निशमन दलाचे विमान आयएल-७६ रवाना केले होते. त्यात १० जवानही होते. जंगलातील बैकाल सरोवराजवळ हे विमान गायब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेच्या अगोदर विमानातून कोणतेही धोक्याचे संकेत मिळाले नाहीत. विमानाचा शोध घेणे कठीण आहे. कारण वणव्यामुळे त्यात अडथळे येऊ लागले आहेत, असे रशियाचे आणीबाणी निवारण विभागाचे व्लादिमीर पककोव्ह यांनी स्पष्ट केले. चार इंजिनांचे हे अवजड वाहतूक करण्याची क्षमता असलेले हे विमान आहे. सुमारे ४२ हजार लिटर (११ हजार गॅलन) पाणी वाहून नेऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...