आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाचे हेलिकॉप्टर सिरियात पाडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - सिरियातील इडलिब प्रांतात सोमवारी रशियाचे एक लष्करी हेलिकॉप्टर क्षेपणास्त्राने पाडण्यात आले. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून पाच जण प्रवास करत होते, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. रशियाचे एमआच-८ जातीचे लष्करी वाहतुकीचे हेलिकॉप्टर जमिनीवरून केल्या गेलेल्या विमानविरोधी क्षेपणास्त्राच्या माऱ्याने कोसळले. हे हेलिकॉप्टर अलेप्पो येथे एका मानवीय मदत मोहिमेवर मदत साहित्य गरजूंना पोहोचवून आले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासात यास हेतुत: पाडण्यात आले, असे रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितल्याचा हवाला देऊन हे वृत्त रशियन न्यूज एजन्सीने दिले आहे.
यात हेलिकॉप्टर (चॉपर)मध्ये तीन क्रू सदस्यांसह दोन अधिकारीही प्रवास करत होते. त्याचा उद्देश, कामाबाबत अद्याप काहीही कळालेले नाही.तपास सुरू असून स्पष्ट काहीही झालेले नाही.
बातम्या आणखी आहेत...