आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाच्या युध्‍द विमानाने 10 फुटांवर रोखले US चे हेरगिरी करणारे विमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे पी-8 विमान. (फाईल फोटो) - Divya Marathi
अमेरिकेचे पी-8 विमान. (फाईल फोटो)
वॉशिंग्टन/बर्लिन - सात महिन्यानंतर रशिया व अमेरिकेचे युध्‍द विमाने पुन्हा एकदा समोरासमोर आली. काळ्या समुद्रावर अमेरिकेचे हेरगिरी करणारे विमान रोखण्‍यासाठी रशियन विमान त्याच्याजवळ 10 फुटांच्या अंतरावर उडत होते.19 मिनिटांपर्यंत दोन्ही एकाच रेषेत होते. रशियाच्या या कृतीला अमेरिकेने 'असुरक्षित व अव्यवसायिक' असे संबोधले आहे. पेंटागॉन म्हणाले, रशियामुळे मोठा अपघात घडू शकत होता. दुसरीकडे रशियानुसार, अमेरिकेच्या विमानाने त्यांच्या सीमेजवळ दोन वेळा आकाशात झेप घेतली होती. या इंटरसेप्ट उड्डाणाच्या वेळी इंटरनॅशनल नियम लक्षात ठेवले गेले. प्रकरण काय आहे...
- बुधवारी ही घटना रशियाच्या सीमेजवळील काळ्या समुद्रावर घडली.
- अमेरिकेच्या संरक्षण अधिका-यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की रशियाच्या युध्‍द विमानाची कृती बेजबाबदारीची होती.
- दुसरीकडे रशियन संरक्षण मंत्रालय म्हणाले, सू-27 विमान अमेरिकेचे पी-8 विमान त्यांच्या सीमेजवळ काय करत आहे हे जाणून घेण्‍यासाठी पाठवण्‍यात आले होते.
- विमानने ट्रान्सपोंडर्स चालू केले नव्हते. यामुळे विमानाच्या हालचालींबाबत संशय बळावला. त्याने एक नव्हे, तर दोन वेळेस सीमेजवळ यायचा प्रयत्न केला होता.
रशिया म्हणाला, पहिल्यांदाच असे घडले नाही, यापूर्वीही अशा घडल्यात
- ही पहिलीच कारवाई नाही, असे रशियाने आपल्या प्रसिध्‍दी पत्रकात म्हटले आहे.
- यापूर्वीही नाटोचे विमान युक्रेनसह देशाच्या दुस-या सीमेजवळ हेरगिरी आणि लष्‍करी कवायतींचा करताना दिले आहेत.
अमेरिका म्हणाला, बेजबाबदार
- पेंटॉगॉनचे प्रवक्ते जेफ डेव्हिस म्हणाले, रशियाच्या या कृतीमुळे अपघात होता होता टळला. दोन्ही युध्‍द विमाने 19 मिनिटे जवळजवळ उडत होते. या दोघांमधील अंतर फक्त 10 फुट होते.
- पी-8 विमान आंतरराष्‍ट्रीय एअरस्पेसमध्‍ये त्यावेळी आपले नेहमीचे काम करत होते.
पूर्वीही दोन्ही देशांमध्‍ये वाढलाय तणाव
- या वर्षी एप्रिलमध्‍येही अशा दोन घटना घडल्या. बाल्टिक समुद्रावर रशिया व अमेरिकेचे युध्‍द विमान समोरासमोर आले होते. तेव्हाही दोन्ही देशांमध्‍ये तणाव निर्माण झाला होता.
- अमेरिकेच्या अधिका-यांनी सांगितले, की रशियन एसयू-27 युध्‍द विमानाने आंतरराष्‍ट्रीय स्पेस फील्डमध्‍ये नेहमीच्या कामास उड्डाण भरले. यावेळी अमेरिकन नौदलाच्या हेरगिरी करणा-या विमानाने खूप जवळून चक्कर मारली होती. यामुळे दोन्ही देशांमध्‍ये तणाव वाढला होता.