आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी होता ट्रॅफिक पोलिस, आता म्हणे 'मी ईश्वराची संतान'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेरजीचे हजारो अनुयायी आहेत... - Divya Marathi
सेरजीचे हजारो अनुयायी आहेत...
इंटरनॅशनल डेस्क - स्वतःला देव मानणारी ही व्यक्ती दक्षिण सायबेरियाच्या पेत्रोपावलोका या गावातील आहे. काही वर्षांपूर्वीच ट्रॅफिक हवालदार राहिलेला सेरजी तोरोप स्वतःला येशू ख्रिस्तांचा अवतार म्हणतो. या गावासह जवळपासच्या परिसरात त्याचे 5000 हून अधिक अनुयायी आहेत. ते सुद्धा सेरजीला ईश्वराची संतान मानतात. लांब केस, दाढी आणि पांढरे पोशाख घालून राहणाऱ्या सेरजीने सांगितल्याप्रमाणे, आपण ईश्वराचे अवतार असल्याची जाणीव झाली. या कथित अवताराचे उपदेश ऐकण्यासाठी शेकडो अनुयायांनी स्थानिक चर्चच्या जवळपास मोठी वस्ती केली आहे. 
 
 
दोन बायका, 6 मुलांचा बाप
- 56 वर्षीय सेरजी स्वतःला ईश्वराची संतान म्हणतो. जवळपासचे हजारो लोकही त्याला जीसस क्राइस्ट (येशू ख्रिस्त) चा अवतार म्हणून पूजा करतात. 
- 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचे तुकडे होण्यापूर्वी सेरजीने रेड आर्मीत सेवा दिली आहे. यानंतर काही वर्षे ट्रॅफिक पोलिस म्हणूनही काम केले आहे. 
- दोन बायका आणि 6 मुले असलेला सेरजी प्रामुख्याने आपल्या अनुयायांना पुनरजन्म, शाकाहार आणि जगबुडीवर उपदेश देत असतो. त्याने आपल्या अनुयायांसमोर सर्वात मोठ्या पुराची सुद्धा सुद्धा भविष्यवाणी केली आहे. 
- गावातली बहुसंख्य स्थानिक त्याचे उपदेश ऐकूण शाकाही बनले आहेत. या व्यतिरिक्त अनेकांनी व्यसन देखील सोडले आहे. 
- सेरजीचे उपदेश ऐकण्यासाठी किंवा त्याच्या सान्निध्यात राहण्यासाठी शेकडो अनुयायांनी चांगले काम आणि नोकऱ्या सोडल्या आहेत. ज्या चर्चमध्ये सेरजी राहतो. त्याच चर्चच्या सभोवताल अवघ्या काही वर्षांतच घनदाट वस्ती झाली आहे.
 
 
पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...