आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Old Women Killed Several People And Even Eaten Their Meat

10 पेक्षा अधिक लोकांची हत्या करून त्यांचे मांस खाणारी Serial Killer

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तमारा सॅम्सोनोव्हा. - Divya Marathi
तमारा सॅम्सोनोव्हा.
सेंट पीटर्सबर्ग - रशियाची ही महिली मानवी मांस खाल्ल्याच्या आरोपांनी घेरली गेली आहे. तिच्यावर 13 जणांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याचा संशय घेण्यात येत आहे. पेन्शनर तमारा सॅम्सोनोव्हा हिला गेल्या महिन्यात 79 वर्षांच्या एका महिलेची हत्या केल्याच्या संशयात अटक करण्यात आली होती. अटकेनंतर अपार्टमेंटमध्ये शोध घेतला तेव्हा तिची एक डायरी सापडली होती. त्यात तमाराने 13 जणांची हत्या केल्याच्या संदर्भात लिहिले आहे. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पीडितांची संख्या यापेक्षा दुप्पट असण्याची शंकाही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही शंकाही व्यक्त केली जात आहे की, तमारा मारलेल्या लोकांचे मांस खात असावी. कारण अनेक पीडितांच्या शरिराचे काही अवयव बेपत्ता आहेत.

डायरीमध्ये तमाराने लिहिले आहे की, मी माझी भाडेकरू वोलोद्या हिचा मर्डर केला. बाथरूममध्ये चाकूने तिचे हात पाय कापले आणि तिच्या शरिराचे तुकडे प्लास्टीक बॅगमध्ये भरून ते शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फेकून दिले. या महिलेवर पतीची हत्या केल्याचा आरोपही आहे. 2005 मध्ये तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्याचा मृतदेह मिळालेला नाही. तमाराने डायरीमध्ये दिवसभराच्या छोट्या छोट्या कामाबाबातही लिहिले आहे. त्यामुळे सेंट पीटर्सबर्गमध्ये राहताना 20 वर्षांदरम्यान तमाराने सर्व पीडितांची हत्या करून त्यांचे तुकडे तुकडे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या आठवड्यात सेंट पीटर्सबर्गमध्ये कोर्टाच्या सुनावणीदरम्यान तमाराने न्यायाधीशांना म्हटले, मी दोषी आहे आणि मला शिक्षा मिळायलाच हवी. त्यानंतर न्यायाधीशांनी तमाराची कोठडीत रवानगी करण्याचा निर्णय दिला. न्यायाधीशांनी तमाराला कस्टडीमध्ये रिमांडवर पाठवण्याचा निर्णय देताच ती टाळ्या वाजवून हसू लागली. तमाराला गेल्या जुलैमध्ये सीसीटीवही फुटेज समोर आल्यानंतर अटक झाली होती. त्यात एक वयस्कर महिला एका बॅगमध्ये मृतदेहाचे तुकडे घेऊन जाताना आढळली होती. त्यानंतर शोध घेतला तेव्हा तलावात एका महिलेचा एक हात आणि एक पाय सापडला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, तमारा सॅम्सोनोव्हाचे काही PHOTO