आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Photographer Ksenia Raykova\'s Doggy Photography

Photography Day: रशियाच्या फोटोग्राफरने टिपले श्वानांचे भावविश्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा त्यामानाने अतिशय अवघड असा प्रकार आहे. कारण वन्य प्राण्यांचे फोटो काढण्यासाठी नेमका किती वेळ लागेल हे कधीही निश्चित नसते. पण पाळीव प्राण्यांचे फोटो काढण्याची मात्र एक वेगळीच गंमत असते. घरातील सदस्यांप्रमाणेच वाढवल्या जाणाऱ्या या प्राण्यांच्या फोटोग्राफीसाठीही आता पॅकेजेस दिले जातात. त्यातही विशेषतः डॉगी (कुत्रा) ही पाळीव प्राण्यांमध्ये सर्वाधिक पसंत केला जाणारा प्राणी आहे.
रशियाची तरुण फोटोग्राफर क्सेनिया रायकोवा ही डॉगीच्या फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. तिने अगदी सुंदरपणे या प्राण्यांचे भावविश्व टिपले आहे. वयाच्या 14 व्या वर्षांपासून क्सेनियाचा डॉगीजबद्दल लळा वाढला. त्यावेळी तिने तिचा पहिला डॉगी आणला होता. क्सेनियाने त्याची अत्यंत सुंदर फोटोग्राफी केली. त्यामुळे तिला वयाच्या अवघ्या 20 वर्षी भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला संपूर्ण रशियामधून अशा प्रकारच्या फोटोग्राफीसाठी बोलावले जाऊ लागले. तिच्या फोटोंना एवढी पसंती का मिळाली, हे तिच्या फोटोतील वेगळेपण पाहून आपल्याला कळेलच. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने क्सेनियाने काढलेल्या डॉगीच्या फोटोतील काही निवडक फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अशाच क्युट डॉगीजचे आणखी काही PHOTOS