आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Pilot Konstantin Murakhtin Vows Pay Back For Lost Co Pilot

रशियन पायलट म्‍हणाला - बदला घेणार, तुर्कीने व्‍यक्‍त केली तिसऱ्या महायुद्धाची भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्‍ल्‍यातून वाचलेले पायलट कॅप्टन कोंस्टेनटिन मुराख्तिन - Divya Marathi
हल्‍ल्‍यातून वाचलेले पायलट कॅप्टन कोंस्टेनटिन मुराख्तिन
मॉस्को/अंकारा - तुर्कीने रशियाचे लढाऊ विमान पाडले. यात पॅरॉशुटच्‍या माध्‍यमातून खाली उडी मारलेल्‍या दोन वैमानिकांपैकी एका वैमानिकाला सीरियाच्या बंडखोरांनी ठार केले. दरम्यान, आपल्‍या सहकाऱ्याच्या हल्ल्याचा बदला घेणार असल्याची घोषणा या हल्‍ल्‍यातून वाचलेले पायलट कॅप्टन कोंस्टेनटिन मुराख्तिन यांनी केली. शिवाय, तुर्कीचा बदला घेण्‍यासाठी आपण सीरियातच राहू, असेही ते म्‍हणाले. दरम्‍यान, या रशियाच्‍या धोरणामुळे तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते, अशी भीती तुर्कीने व्‍यक्‍त केली.

तुर्कीने राष्‍ट्रपती तैयप अॅरदोगान म्‍हणाले , ''आम्‍ही रशियासोबत तणाव वाढवणार नाही. मात्र, आम्‍ही रशियाचे जे विमान पाडले ती कारवाई योग्‍यच होती,'' असे ते म्‍हणाले.
रशियाच्या या लढाऊ विमानाने केवळ पाच मिनिटांत दहा वेळा तुर्कीच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यानंतर दोन एफ-16 जातीच्या विमानांनी रशियन विमान पाडले. त्‍या नंतर दोन्‍ही देशांत तणाव निर्माण झाला.

तुर्कीने वॉर्निंग दिली नव्‍हती, पायलटचा दावा
>>या हल्‍ल्‍यातून वाचलेल्‍या रशियाच्‍या पायलटने दावा केला की, तुर्कीच्‍या हवाई क्षेत्रात गेल्‍यानंतर आम्‍हाला कुठलीच वॉर्निंग दिली गेली नाही किंवा रेडिओ कम्युनिकेशनही केले नाही.
>>कॅप्टन मुराख्तिन यांनी सांगितले, "आमच्‍या विमानाच्‍या मागील बाजूस अचानक क्षेपणास्‍त्र येऊन धडकले. त्‍यामुळे आम्‍ही विरोधी क्षेपणास्त्र शस्‍त्राचा वापर करू शकलो नाही. आम्‍ही कुठे आहोत, हे मी नकाशा आणि जमिनीवर पाहू शकत होतो. "
>>दुसरीकडे रशियाच्‍या वैमानिकांना दिलेल्‍या वॉर्निंगची ऑडिओ टेप तुर्कीने जाहीर केली.
>>या रेकॉर्डिंगमध्‍ये ' तुमची दिशा बदला,' अशी सूचना ऐकू येत आहे.
दोन दिवसांपूर्वी काय झाले होते?
>> सीरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी या लढाईत उतरलेल्या रशियाला मंगळवारी तुर्कीने डिवचले. रशियाचे एक लढाऊ विमान तुर्कीने सीरियाच्या सीमेवर पाडल्याने प्रचंड तणाव पसरला असून, रशियानेही हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे म्हटले आहे.
>> रशियन विमानाने आपली हवाई हद्द ओलांडल्याने आपण ही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण तुर्कीने दिले आहे.
>> या लढाऊ विमानामध्‍ये रशियाचे पायलट लेफ्टिनेंट कर्नल ओलेग पेशकोव आणि कॅप्टन कोन्स्टेनटिन मुराख्तिन होते.
>> पॅरॉशुटच्‍या माध्‍यमातून खाली उतरल्‍यानंतर पेशकोव यांना सीरियाच्‍या स्थानिक बंडखोरांनी ठार केले. दरम्‍यान, दुसरे पायलट मुराख्तिन यांना रशियाच्‍या स्पेशल फोर्सेसने शोध मोहीम राबवून वाचवले.
रशिया-तुर्कीमध्‍ये काय आहे वाद?
>> रशिया आणि तुर्की सीरियात दहशतवाद्यांविरुद्ध लढत आहे.
>> तुर्की राष्‍ट्र अमेरिका आणि फ्रान्‍ससोबत आहे. दुसरीकडे रशिया स्‍वत: आयएसआयएसवर हल्‍ले करून सीरियाचे राष्ट्रपती असद यांना मदतीचा हात देत आहे.

रशियाने पाठवले मिसाइल क्रूजर पाठवले
सीरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी या लढाईत उतरलेल्या रशियाचे एक लढाऊ विमान तुर्कीने सिरियाच्या सीमेवर पाडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्‍यान, यामुळे खवळलेल्‍या रशियाने आपल्‍या लढाऊ विमानांवर तुर्कीला सह‍जतेने निशाणा साधता येऊ नये, यासाठी एक क्षेपणास्‍त्र क्रूजर सीरियाच्‍या कोस्टर परिसराकडे रवाना केले. शिवाय दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्‍या या युद्धात तुर्कीची मदतही बंदी केली असून, जेथून लष्करी विमानांच्या हालचाली सुरू होतात त्‍या विमानतळांवर (एयरबेस) सुरक्षा वाढवली आहे.
रशियाने केल्‍या तीन मोठ्या घोषणा
>> लढाऊ विमानांच्‍या माध्‍यमातून आता स्ट्राइक ग्रुप्सचे सर्वर ऑपरेशन्स पटताळून पाहिले जातील.
>> वायू सुरक्षा वाढवण्‍यासाठी लताकिया कोस्टमध्‍ये मार्गदर्शक क्रूजर क्षेपणास्‍त्र 'मोस्क्वा' तैनात केले जाणार आहे. लढाऊ विमानांवर हल्‍ला होऊ शकतो, असा धोका वाटला तर त्‍वरित प्रत्‍युत्‍तर दिले जाईल.
>> तुर्कीसोबत असलेला सैन्‍य दलाचा करार रद्द करण्‍यात आला.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...