आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Explosive Device Planted In The Luggage Hold Of Russian Plane

कार्गोमध्‍ये स्‍फोटके ठेवल्‍यानेच रशियन विमानाला अपघात : UK चा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - रशियन प्रवासी विमानाच्‍या अपघात प्रकरणी आता ब्रिटिश इन्‍व्‍हेस्टिगेटर्सने नवीन खुलासा केला आहे. इन्‍व्‍हेस्टिगेटर्सचे मत आहे की, कार्गो कम्पार्टमेंटमध्‍ये ठेवण्‍यात आलेल्‍या स्‍फोटक साहित्‍यामुळे हा अपघात झाला. शुक्रवारी यासंदर्भातील एक अहवाल समोर आला. त्‍यामध्‍ये असे म्‍हटले की, सामानाच्‍या आत स्‍फोटक पदार्थ ठेवण्‍यात आले असावे.
काय आहे प्रकरण
रशियाच्या एका विमानाला सेंट्रल सिनाई पेनिनसुलाजवळ शनिवारी अपघात झाला होता. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व म्हणजे 224 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विमानातील सात क्रू मेम्बर्स आणि 17 लहान मुलांचाही समावेश होता. विमान कोसळल्यानंतर त्याचे तुकडे झाले होत. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे विमान पडल्याचा अंदाज होता. मात्र नंतर इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी गटाच्या इजिप्तमधील शाखेने हे विमान पाडल्याचा दावा केला गेला. काही तज्ज्ञांनी असेही म्‍हटले होते की, इतक्या उंचीवरचे विमान पाडता येणे शक्‍य नाही.
स्‍फोटामुळे झाला अपघात?
गुरुवारी अमेरिकेच्‍या गुप्तचर अधिका-यांनी सांगितले होते की, विमान अपघातात स्‍फोट झाल्‍याचे लक्षात आले होते. या दुर्घटनेमागे स्‍फोटाचे कारण होते. विमानात हे बॉम्‍ब ठेवण्‍यामागे आयएसआयएस किंवा त्‍यांच्‍या इतर संघटनेचा हात असू शकतो अशी शंकाही अधिका-यांनी व्‍यक्‍त केली होती. पण रशिया आणि इजिप्तच्‍या अधिका-यांचे म्‍हणने आहे की, दुर्घटनेचे कारण बॉम्‍बस्‍फोट आहे हे आताच सांगणे योग्‍य ठरणार नाही; सर्व बाबींचा तपास केल्‍यानंतर तसे ठोस कारण सांगता येईल.

विमानाच्‍या उड्डाणांवर बंदी
इजिप्तच्‍या अधिका-यांनी शर्म अल शेखपासून ब्रिटन जाणा-या विमानांची उड्डाणे थांबवली आहेत. त्‍यामुळे आता ब्रिटिश एयरलाइन्सचे विमाने थांबली आहेत व तेथे 4 हजार ब्रिटिश प्रवाशी अडकलेले आहेत. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी बुधवारी सांगितले की, शासनाने सुरक्षेच्‍या कारणामुळे ही विमाने थांबवली आहेत. सुरक्षेसंदर्भातील प्रक्रीया शुक्रवारी सुरळीत होणार होती, पण पुन्‍हा व्‍यत्‍यय आल्‍याने विमाने थांबवण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..