आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : रशियन प्लेन क्रॅश : अपघात की हल्‍ला ? IS च्‍या दाव्‍यानंतरही गूढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - रशियन एअरलाइन्सचे एअरबस ए-३२१ हे विमान शनिवारी इजिप्तच्या सिनाई भागात कोसळून सर्व २२४ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात १३८ महिला, ६२ पुरुष, १७ मुले आणि चालक दलाच्या ७ सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, रशियाच्या सिरियातील हल्ल्यांच्या विरोधात आपण विमान पाडले, असा दावा इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेने केला आहे. जळालेल्या अवस्थेतील १०० जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. दरम्‍यान, हे विमान आपणच पाडले याचा पुरावा म्‍हणून आयएसएसने एक व्‍ह‍िडिओ सार्वजनिक केला आहे. मात्र, संरक्षण अधिकाऱ्यांनी त्‍यांचा दावा फेटाळून लावला. पण, हा अपघात कसा झाला, हा प्रश्‍न अजूनही सुटला नाही. रशियाचे दळण-वळण मंत्री यांनी घटनास्‍थळावर जावून पाहणी केली.

काय आहे ISIS च्‍या व्‍ह‍िडियोमध्‍ये ?

आयएसआयएसशी निगडित असलेल्‍या एका संघटनेने हा व्‍हिडिओ प्रसारीत केला. यामध्‍ये एक विमान जमिनीच्‍या दिशेने येताना दिसत आहे. पण, हे चित्रण अस्‍पष्‍ट असल्‍याने ते अपघातग्रस्‍तच विमान आहे, हे अजूनही स्‍पष्‍ट झाले नाही. या विमानातून मोठ्या प्रमाणात धूर दिसत आहे. पण, आपण या विमानावर कसा हल्‍ला केला, हे आयएसएसने सांगण्‍याचे टाळले.

२३ मिनिटांतच संपर्क तुटला : विमानाने शर्म-अल-शेख शहरातून रशियाच्या सेंट पीटर्सबर्गकडे उड्डाण घेतल्यानंतर २३ मिनिटांतच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. ते ३० हजार फुटांवरून उडत असताना शेवटचा संपर्क झाला होता. वायरलेस उपकरण बिघडले असून जवळच्या विमानतळावर अापत्कालीन लँडिंग करत आहोत, असे वैमानिकाने नियंत्रण कक्षाला सांगितले.

विमान कंपनीवर खटला : हे विमान रशियातील कोगलिमव्हिया या कंपनीने होते. विमान उड्डाणाच्या नियमांचा भंग केल्याबद्दल कंपनीवर खटला दाखल करण्यात आला आहे.

ब्लॅक बॉक्स सापडला : सिनाईच्या अल-अरिशजवळ विमानाचे अवशेष व ब्लॅक बॉक्स सापडला. सीटबेल्ट बांधलेल्या अवस्थेतच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे दृश्य घटनास्थळी होते.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..