आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा डेः रशियन राष्ट्राध्यक्षांचा सवाल, काय मोदी खरोखरच योगा करतात?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि मोदी... - Divya Marathi
फाईल फोटो- रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि मोदी...
सेंट पीटर्सबर्ग- रविवारी उद्या (21 जून) जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. अशावेळी जगातील सर्वात ताकदवार नेत्यांपैकी एक असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सवाल केला आहे. एका पत्रकार परिषदेत पुतिन यांना सांगितले की, मोदींनी योगासाठी एक स्वतंत्र मंत्रालय खोलले आहे यावर पुतिन यांनी तत्काळ विचारले की, काय मोदी खरोखरच योगा करतात? पुतिन सेंट पीटर्सबर्गमध्ये भरलेल्या इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरमच्या दुस-या दिवशी पत्रकारांना सामोरे जात होते.
मोदींच्या मंत्रालयावर घेतली शंका-
योगासह आरोग्यासाठी बनविण्यात आलेल्या आयुष मंत्रालयाबाबत शंका उपस्थित करीत हसत पुतिन म्हणाले, हे प्रत्येक जण थोडेच करू शकतो. त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत म्हटले की, जो व्यक्ति जगभर योगाचा प्रसार करीत आहे ती व्यक्ती योगा खरोखरच करते का? आपल्याला माहित असेलच की, गेल्या वर्षी भारतात मोदी सरकार आल्यानंतर आयुर्वेद, योग, यूनानी, सिद्ध आणि होमोयपॅथी उपचार पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. पीएम मोदींनी केलेल्या प्रयत्नानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा जागतिक योगा दिवस म्हणून घोषणा केली होती. यावर जगभरातील 117 देशांनी सहमती दाखवली होती.
पुतिन म्हणाले, मोदी कठोर भूमिका घेणारी व्यक्ती-
पुतिन यांनी मोदींबाबत सांगितले की, ते एक चांगले व्यक्ती आहेत, तसेच ते माझे चांगले मित्र आहेत. त्यावर एका पत्रकाराने सवाल केला की, मोदी आणि पुतिन या दोनही नेत्यांना कडक नेते समजले जाते यावर रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. मी कडक व्यक्ती नाही तर समझोता कसा करायचा हे मी जाणतो. तर, मोदी कठोर भूमिका घेतात. पुतिन पुढे म्हणाले, मोदींसाठी समोरचा व्यक्ती एक तर चुकीचा असतो किंवा बरोबर...
पुढे वाचा, मोदी रोज सकाळी एक तास करतात योगा...
बातम्या आणखी आहेत...